spot_img
spot_img

प्रवरा गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचां आंतरशालेय प्रश्नमंजुषा स्पर्धेत” प्रथम क्रमांक.

लोणी दि.५ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-प्रवरा गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज लोणी येथे आंतरशालेय इंग्लिश प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न झाली .या स्पर्धेमध्ये प्रवरेच्या इंग्रजी माध्यमाच्या एकूण पाच शाळांनी सहभाग घेतला होता. त्यात प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान प्रवरा गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूलच्या संघाला मिळाला आहे.अशी माहीती प्राचार्या सौ.रेखा रत्नपारखी यांनी दिली.

या संघाचे नेतृत्व सिद्धी घोगरे , ध्रुवा बेंद्रे आणि ऋतुजा म्हस्के या विद्यार्थिनींनी केले.द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सैनिक स्कूल च्या संघाने प्राप्त केले असून तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूल प्रवरानगर च्या संघाने मिळवले आहे.

यशस्वी विद्यार्थिनींचे राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डाॅ.सुजय विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे ,अतिरिक्त कार्यकारी अधिकारी शिवानंद हिरेमठ संस्थेचे अतांत्रिकचे संचालक प्रा. डॉ.प्रदिप दिघे तसेच शिक्षण संचालिका सौ.लिलावती सरोदे ,शिक्षण समन्वयक प्रा.नंदकुमार दळे विद्यालयाच्या प्राचार्या सौ.रेखा रत्नपारखी प्राथमिक विभाग पर्यवेक्षिका सौ. अर्चना घोगरे व शाळेचे सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!