spot_img
spot_img

टाकळीभान येथील १६ चारीवरील लाभधारक शेतकऱ्यांची विविध मागणी करिता पाटबंधारे विभागाला निवेदन

टाकळीभान, ( जनता आवाज वृत्तसेवा ):-  श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान येथील १६ चारीचे कालवा निरीक्षक रोहिदास दातीर यांची बदली रद्द करावी, चारीच्या दुरूस्तीसाठी जे सी बी मिळावा, पाण्याचे वेळापत्रक मिळावे अशी मागणी १६ चारी वरील लाभधारक शेतकर्‍यांनी उपविभागीय अधिकारी पाटबंधारे विभाग, श्रीरामपूर, तहसिलदार श्रीरामपूर, शहर व ग्रामीण पोलिस स्टेशन श्रीरामपूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, १६ चारीचे मागील हंगामात नोव्हेंबर ते जून या दरम्यान पाटपाण्याचे नियोजन कालवा निरीक्षक रोहिदास दातीर यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केले आहे. तसेच पाणी अर्ज मोठ्या प्रमाणात भरुन घेतले आहे. त्यामुळे त्यांची कार्यपद्धती चांगली असून त्यांची बदली न करता त्यांना कायम या चारीवर ठेवावे,

१६ चारीमध्ये मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे व गवत वाढले आहे त्यामुळे पाण्याची गळती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तरी जेसीबी मशीनने चारीची साफ सफाई व दुरुस्ती करण्यात यावी व पाटपाण्याचे यावर्षीचे वेळापत्रक लवकरात लवकर जाहीर करावे व भंडादारा धरण ते ओझर नदी ही पाट स्वरूपात  वाहत असते असा कायदाच आहे पण पाटबंधारे विभागाच्या दूर्लक्ष त्यामूळे अंदाजे २५०० छोटे बंधारे व विहिरी  त्यात आहे त्या अनधिकृत  आहे त्याची चौकशी करावी व कारवाई करावी.

अशी मागणी करण्यात आली असून दिनांक ९/११/२०२३ पर्यंत या मागण्या बाबत कार्यवाही करावी तसे न केल्यास कोणतीही पुर्वसुचना न देता १६ चारीवरील लाभधारक शेतकरी अमरण उपोषण करणार असल्याचे निवेदनात नमुद केले आहे.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!