राहाता, दि.६( जनता आवाज वृत्तसेवा ):-राहाता तालुक्यातील बारा ग्रामपंचायतींच्या निवडणूकीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे ९ ग्रामपंचायतींवर निर्विवाद वर्चस्व सिध्द झाले असून, त्यांच्या गटाच्या सर्व उमेदवारांनी दणदणीत विजय मिळविला आहे.
तालुक्यातील धनगरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदावर गोपिनाथ भाऊसाहेब खरात हे विजयी झाले असून, या ग्रामपंचायतीच्या सर्व जागांवर विखे पाटील गटाने विजय मिळविला आहे. को-हाळे ग्रामपंचायत निवडणूकीत सरपंच पदाच्या उमेदवार झिंझुर्डे पुजा प्रमोद या विजयी झाल्या असून, या ग्रामपंचायतीवरही विखे गटाच्या जनसेवा मंडळाने आपले वर्चस्व राखले आहे. दुर्गापूर ग्रामपंचायत निवडणूकीत नानासाहेब पुलाटे हे विखे गटाचे उमेदवार विजयी झाले आहे. दहेगाव को-हाळे ग्रामपंचायतीमध्ये विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सौ.पुनम संदिप डांगे यांनी सरपंच पदावर विजय मिळविला आहे. या ग्रामपंचायतीमध्ये सर्व सदस्य पदाच्या जागांवर विखे पाटील गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत.
कनकुरी ग्रामपंचायत निवडणूकीत सौ.संगिता गोरक्ष गोत्रिक्ष यांच्यास दहा जागांवर विखे पाटील गटाने बाजी मारली असून, निमगाव को-हाळे ग्रामपंचायतीमध्ये कैलास कातोरे यांनी नेत्रदिपक विजय संपादन करुन, चौदा जागा जिंकल्या आहेत. दाढ बुद्रूक ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये तात्यासाहेब नवथान सातपुते हे विजयी झाले असून, या ग्रामपंचायतीमध्ये विखे गटाने १८ जागांवर विजय मिळविला आहे. आडगाव बुद्रूक ग्रामपंचायत निवडणूकीत सरपंच पदाची पोटनिवडणूक संपन्न झाली यामध्ये विखे पाटील गटाचे बाबासाहेब निवृत्ती माळी हे विजयी झाले आहेत.
रुई ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये सौ.शितल संदिप वाबळे ह्या विजयी झाल्या आहेत. पिंप्री निर्मळ ग्रामपंचायतीमध्ये सौ.पुनम विशाल कांबळे यांनी विजय मिळविला आहे. मंत्री विखे पाटील यांना माणणा-या दोन्हीही गटांनी १२ जागा मिळविल्या आहेत. चार ग्रामपंचायतींच्या सरपंच पदावर महिला विराजमान झाल्या आहेत. यासर्व विजयी उमेदवारांचे महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, माजीमंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांच्यासह सर्व संस्थाच्या पदाधिका-यांनी अभिनंदन केले आहे.



