लोणी दि.३( जनता आवाज
वृत्तसेवा ):-राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून लोणी येथील पदमश्री विखे पाटील पॉलिटेक्निकने दरवर्षीप्रमाणे उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम राखली असून कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी या विभागातील कु. श्रध्दा रवींद्र काकडे हीने हिने ९४.१७ टक्के गुण प्राप्त करून महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावीला असून श्रीमती सिंधूताई विखे पाटील सुवर्ण पदकाची मानकरी ठरली आहे. तसेच कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी विभागातील कु. सायली सुनिल लगड ९३.४९ टक्के गुणांनी द्वितीय आणि मोहीत शाम इंगळे हिने ९२ टक्के गुण मिळवून तृतिय क्रमांक मिळविला असल्याची माहिती प्राचार्य प्रा. डॉ. विजयकुमार राठी यांनी दिली
तंत्रशिक्षण मंडळाच्या वार्षिक परिक्षेमध्ये या तंत्रनिकेतनच्या मुलींनी यावर्षीदेखील निकालामध्ये मुलांच्यापुढे मुसंडी मारलेली आहे. विभागवार प्रथम क्रमांकाचे मानकरी कॉम्प्युटर विभाग – कु. श्रध्दा रवींद्र काकडे हीने हिने ९४.१७ टक्के, केमिकल – दर्शन खामत ९०.३३ टक्के, सिव्हिल – ललित प्रणयसिंग साळुंके ८६.१६ टक्के, मेकॅनिकल- युवराज समिर गुमास्ते ८५.१३ टक्के, ऑटोमोबाइल – सिध्दांत जाधव ७५ टक्के, ईलेक्ट्रॅानिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन – कार्तिक लक्ष्मण शेळके ८५.१८ टक्के गुण प्राप्त झाले आहेत. तसेच क्लाऊड कॉम्प्युटींग अँण्ड बिग डेटा विभागात द्वितीय वर्षात पार्थ मिलिंद कुलकर्णी ८६.९६ प्रथम, मेकॅट्रॉनिक्स विभागात कृष्णा बाळासाहेब थोरात याने ८५ टक्के गुण प्राप्त करून घवघवीत यश संपादन केले आहे. नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शाखाली संस्थेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी विविध अभिनव उपक्रम राबविण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांची गुणवत्ता सिध्द होत आहे. त्यामुळे नोकरीच्या संधी देखील मोठ्या प्रमाणात मिळत असल्याचे डॉ. विजयकुमार राठी यांनी सांगितले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व महसुल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, विश्वस्त आण्णासाहेब म्हस्के पाटील, संस्थेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. विजय राठी, उपप्राचार्य प्रा. नामदेव गरड, कॉम्प्युटर विभाग प्रमुख प्रा. रवींद्र काकडे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.




