spot_img
spot_img

प्रवरेच्या आर्किटेक्चरच्या लक्ष्मी डावखर हिची भुज येथे होणाऱ्या राष्ट्रीय शिबिरासाठी निवड

लोणी दि.७ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-प्रवरा रुरल कॉलेज ऑफ आर्किटेक्चर लोणी यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक लक्ष्मी डावखर या विद्यार्थिनीची दिनांक २० ते २६ नोव्हेंबर २०२३ दरम्यान क्रांतिगुरू शामजी कृष्ण वर्मा कच्छ विद्यापीठ भुज गुजरात येथे होणाऱ्या राष्ट्रीय एकात्मता शिबिरामध्ये निवड झाली आहे. यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. दीपिका आरबट्टी यांचे तिला मार्गदर्शन लाभले.

सदर शिबिरासाठी पुणे विद्यापीठातून रसेयो विभागाचे एकूण दहा विद्यार्थी विद्यार्थिनी आणि एक संघनायक असा संघ सहभागी होणार आहे. यामध्ये आपल्या ग्रामीण भागातून अशा शिबिरासाठी निवड होणे ही अभिमानाची गोष्ट आहे, अशी माहिती प्राचार्य तेजश्री ठाणगावकर यांनी दिली.

या यशाबद्दल तिचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच प्राचार्य तेजश्री ठाणगावकर यांनी हार्दिक अभिनंदन केले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!