नेवासा फाटा ( जनता आवाज
वृत्तसेवा ):-आज संगमनेर येथे अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे.अ. जा.विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे यांनी भेट दिली.यावेळी आमदार डॉ.सुधीरजी तांबे यांच्या निवासस्थानी संगमनेर शहराच्या नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी वाघमारे यांचा औक्षण करून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.
या वेळी दुर्गा ताई म्हणाले की थोरात साहेब ज्याच्या पाठीमागे उभे राहतात निष्ठेने आणि विश्वासाने उभे राहतात म्हणून थोरात साहेब ज्याच्या पाठीमागे उभे राहतील त्यांचा विजय निश्चित असतो.
यावेळी निखिलजी पापडेजा, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव बंटीभाऊ यादव, सांस्कृतिक काँग्रेसचे प्रदेश सचिव चंद्रशेखर कडू,शहर काँग्रेसचे अध्यक्ष सोमेश्वर दिवटे, शेखर सोसे,काँग्रेसचे नेते नामदेवराव चांदणे, जिल्हा युवक काँग्रेसचे वैभव वाघमारे,
आधी युवक व पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.




