11 C
New York
Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img
spot_img

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आणि विरोधी पक्ष नेतेपदी जितेंद्र आव्हाड यांची नेमणूक

मुंबई (जनता आवाज वृत्तसेवा ):- आज सकाळपासून महाराष्ट्रात मोठी राजकीय नाट्यमय व मोठी उलथापालत पाहायला मिळाली. अजित पवार यांनी राजकीय बंड करत सरकारमध्ये सामील होण्याचे ठरवले.

 यानंतर   अजित पवार आणि आठ आमदारांनी राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांकडे उप मुख्यमंत्रिपद सोपवण्यात आले आहे. अजित पवारांनी बंड केल्याचे समोर आल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील नव्या नेत्यांकडे काही जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आणि विरोधी पक्ष नेतेपदी जितेंद्र आव्हाड यांची नेमणूक करण्यात आली आहे.

अनिल पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रतोदपद होते. अनिल पाटील हे अजित पवार यांच्यासोबत बंडात सहभागी झाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने जितेंद्र आव्हाड यांच्याकडे ही जबाबदारी दिली आहे.त्याशिवाय अजित पवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी विरोधीपक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेसने जितेंद्र आव्हाड यांच्याकडे विरोधीपक्षनेतेपद सोपवले आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्याकडे विरोधीपक्षनेतेपद दिल्यामुळे राज्याला मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेता एकाच जिल्ह्यातून मिळाला आहे. एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड हे ठाण्याचे आहेत. एकाच जिल्ह्यातील मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेतेपद होण्याची ही पहिलीच घटना असेल.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!