spot_img
spot_img

केलवड खु. सेवा सहकारी संस्थेतील अपघात विमा अनावरण उपक्रम खा. डॉ सुजय विखे यांच्या शुभहस्ते संपन्न

केलवड (जनता आवाज वृत्तसेवा):- केलवड खुर्द येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या वतीने आज संस्थेच्या सर्व सभासदांसाठी अपघाती विमा उतरविण्यात आला आहे. या विमा योजनेचे अनावरण खा. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.

संवाद साधताना खासदार विखे म्हणाले की, आपल्या सभासदांचे हित जोपासणारी व प्रत्येक सभासदांच्या सुखदुःखात सहभागी असणारी ही सेवा सोसायटी आहे. या सेवा सोसायटीने प्रत्येक सभासदांचा भविष्यकालीन विचार करून अपघाती विमा उतरवण्याचा हा अनोखा उपक्रम राबविला, खरंतर ही खूप कौतुकास्पद गोष्ट आहे असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.

दरम्यान दिवाळीच्या सणानिमित्त शिर्डी मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबाला नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून पाच किलो मोफत साखर वाटप केली जात असून आज केलवड येथे खासदार सुजय विखे पाटील यांच्या हस्ते साखर वाटप देखील करण्यात आले.

या उपक्रमाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, विखे पाटील परिवार हा प्रत्येकाच्या सुखदुःखात नेहमी सहभागी होत असतो. मुळात सर्व नागरिकांना एक कुटुंब म्हणून पुढे नेण्याचे काम अविरतपणे विखे कुटुंबियांकडून होत असून याच अनुषंगाने नागरिकांची दिवाळी गोड व्हावी म्हणून सदरील उपक्रम राबविला जात आहे. एक कुटुंब म्हणून जशी आपण सर्वांची जबाबदारी आणि काळजी घेतो त्याच भावनेतून राबविण्यात आलेला हा छोटासा उपक्रम असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी संस्थेचे चेअरमन सुनील सुभाषराव गमे, व्हा. चेअरमन संदीप नामदेव बढे, सचिव बाबासाहेब गाढवे तसेच जेष्ठ सभासद उपस्थित

सुभाषराव गमे,तबाजी घोरपडे, पि डी गमे, ॲड अनिल गमे,बाळासाहेब गमे,ज्ञानेश्वर वाघे,भारत राऊत, बाबासाहेब कांदळकर,श्रीनिवास घोरपडे, बापू राऊत, चंद्रकांत गमे,काळू रजपूत, बाळासाहेब तुरकणे,दत्तू गोरडे,विजय गोरडे, नवनाथ वाघे,लक्ष्मण ठोंबरे, पुंडलिक गमे,प्रशांत गमे, सचिन घोरपडे, हरिभाऊ गायकवाड, भास्कर घोरपडे, संदीप गोसावी, वाल्मिकी गमे, निवृत्ती गमे, वाल्मिकी तुरकणे, कचरू वैद,साळबा कांदळकर,विशाल वाघे

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!