माळवाडगाव ( जनता आवाज वृत्तसेवा):श्रीरामपूर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या मुठेवाडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीत महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील साहेब व लोकनेते मा.आ.भानदास मुरकुटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मुठेवाडगाव सोसायटीने अडबंगनाथ देवस्थानचे स्वामी अरुणनाथगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते सभासदांना १५ टक्के लाभांश व आनंदाचा शिधा वाटप कार्यक्रम संस्थेच्या प्रांगणात संपन्न झाला.
याप्रसंगी प्रास्ताविक व स्वागत भाजपचे तालुका उपाध्यक्ष डॉ शंकरराव मुठे यांनी सोसायटीने अकरा वर्ष नंतर प्रथमच ६२६ सभासदांना ७ लाख १५९८२रुपये लाभांशाचे वाटप करण्याचा निर्णय सर्व संचालकांनी घेतला असे सांगितले.
याप्रसंगी अरुणनाथगिरी महाराज यांनी सांगितले की मुठेवाडगावला खऱ्या अर्थाने सद्गुरु संत तुळशीराम महाराज तपस्वी संन्यासी संत यांनी बारवेत पाण्यावरती अंथरूण टाकून त्यावरती बसून तपश्चर्या केली असे एकजुटीचे वागणारे व परमार्थातील आदर्श गाव मुठेवाडगाव आहे महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमी आपण सर्वजण राहतात हे आपलं भाग्य आहे तसेच मागील वर्षी निसर्गाने साथ दिल्याने यावर्षी दुष्काळात सभासदांना 15 टक्के लाभांश मिळाला त्यामुळे सभासदांच्या चेहऱ्यावरती आनंद या ठिकाणी दिसत आहे.संस्थेतून घेतलेले कर्ज वेळेवर भरावे व संस्थेला सहकार्य करावे आदर्शवत परमार्थ प्रिय हे गाव असून मुठेवाडगाव सोसायटीचे कार्य कौतुकास्पद असल्याचे व हे गाव पंचक्रोशीत धार्मिक, सामाजिक,राजकीय, सर्वच बाबतीत आघाडीवर असते. आणि ह्या गावचे एक वैशिष्ट्य म्हणजे राजकारण संपल्या नंतर संपूर्ण गाव एकत्र येऊन सर्व कार्यक्रम एकत्र करतात. आज दुष्काळी परिस्थिती असतानी सभासदांना सोसायटीने १५ % लाभांश देऊन सभासदांची दिवाळी गोड केल्याबद्दल त्यांनी संस्थेचे माजी चेअरमन डॉ शंकरराव मुठे यांचे विशेष कौतुक केले व विद्यमान चेअरमन शकुंतला संपतराव मुठे व शिवाजी मुठे यांचे मनापासून आभार मानले.
याप्रसंगी ॲड.दिलीप मुठे,भाऊसाहेब मुठे व ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष वसंतराव मुठे कारेगाव भागचे व्हा.चेअरमन शिवाजी मुठे,पत्रकार भाऊसाहेब काळे,विठ्ठलराव असणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला व यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी प्रा. शिवाजी जासूद,लहानू मुठे, चांगदेव मुठे,जालिंदर मुठे,मल्हारी मुठे,गणेश गोसावी सुरेश मुठे, लखन महाराज,धर्मनाथ महाराज,ग्रामपंचायत सदस्य अनिल मुठे, दिनकर मुठे, तुकाराम मुठे,बळीराम मुठे,अशोक चौधरी, नामदेव मुठे, आप्पासाहेब मुठे, विनायक मुठे,बाबासाहेब मुठे,साईनाथ मुठे, सोमनाथ मुठे, विश्वास शिरसागर रामेश्वर बोरुडे सौ विमल मुठे, सोसायटीचे संचालक भागवत मुठे,संभाजी गोसावी,अण्णासाहेब मुठे, सचिव दत्तात्रय जासूद,किरण मुठे, विलास खैरे आदी सभासद उपस्थित होते आभार सोसायटीचे संचालक प्रा.कोळसे सर यांनी मानले.



