लोणी,दि.९ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने दिवाळीच्या निमित्ताने आपल्या सर्व कामगारांना २० टक्के बोनस जाहिर केला असल्याची माहीती कारखान्याचे चेअरमन कैलासराव तांबे यांनी दिली.
महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.विखे पाटील कारखान्याने सदैव शेतकरी आणि कामगारांचे हित जोपासले आहे. दिवाळी सणाचे औचित्य साधून कामगारांनाही २० टक्के बोनस देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला. यावर्षी कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना २७०० रुपये प्रतिटन भाव कारखान्याने दिला असून, मागील गळीत हंगामात गाळपासाठी बाहेरुन आलेल्या ऊस उत्पादकांनाही तेवढाच भाव देवून दिलासा दिला आहे.
मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून कार्यक्षेत्रात ऊसाचे उत्पादन वाढावे म्हणून कारखान्याच्या माध्यमातून शेतक-यांना सहकार्य करण्यात येत आहे. पुढील वर्षाचा भावही ना.विखे पाटील यांनी ३ हजार रुपये जाहीर केला असून, यंदाचा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी संचालक मंडळाने तसेच सर्व विभागांनी परिपुर्ण नियोजन केले असल्याचे चेअरमन कैलास तांबे म्हणाले.



