राहुरी (जनता आवाज वृत्तसेवा):- राहुरी तालुक्यातील गुहा येथील गुहा- तांभेरे रोड लगत असलेल्या हॉटेल 7/12 च्या पाठीमागे पत्र्याच्या शेडमध्ये चालू असलेला जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून सात जणांना ताब्यात घेतले आहे.
जुगार खेळण्याची ठिकाणी पोलीस ज्यावेळेस छापा मारण्यास गेली असताना त्यावेळी सात जणांना ताब्यात घेण्यात आले. व अंधाराचा फायदा घेऊन इतर तीन जण पसार झाले. या छाप्यात पोलिसांनी तब्बल 12 लाख 47 हजार 450 रुपये मुद्देमाल जप्त केला आहे.
गुरुवारी दिनांक 29 जून रोजी रात्री ११:३० च्या दरम्यान गुहा तांभेरे रोडवर असणाऱ्या हॉटेल 7/12पाठीमागे शेडमध्ये जुगारी तिरट नावाचा जुगार पैसे लावून खेळत होते. अशावेळी पोलिसांनी अचानक छापा टाकत अनिल चंद्रभान ओहोळ (30, रा. गुहा ), गणेश बाळासाहेब वरखडे (35, रा. देवळाली प्रवरा) अजय रामराव जाधव(40, रा. देवळाली प्रवरा ) बाबा निवृत्ती बर्डे ( रा. एकलव्य वसाहत राहुरी ) या ना पकडण्यात आले आहे. बाकीचे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले आहेत. सचिन मोहन बर्डे ( रा. एकलव्य वसाहत राहुरी), ख्वाजा करीम शेख ( रा. देवळाली प्रवरा ) पिंटू थोरात हे तिघीजणी पसार झालेली आहेत.
या छाप्यात पोलिसांनी एक वेरना कार, एक महेंद्र बोलेरो, एक बुलेट, एक एक्टिवा, एक स्टार टीव्हीएस कंपनीच्या दोन मोटरसायकल, एक्स स्प्लेंडर मोटर सायकल, ६०० रुपये रोख तसेच ५२ पत्ते असा एकूण बारा लाख 47 हजार 450 रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद ढाकणे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसात वरील 9 आरोपी विरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम 1887 चे कलम 12 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनी लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस करीत आहे.