8.4 C
New York
Saturday, October 25, 2025

Buy now

spot_img
spot_img

उदयन गडाख यांच्या पुढाकारातून सोनई येथील तरुणांचे पंढरपूर स्वच्छता अभियान

नेवासा फाटा ( जनता आवाज वृत्तसेवा):- यशवंत सामाजिक प्रतिष्ठान सोनई,आर्ट ऑफ लिव्हिंग, पसायदान आनंदवन व युवा चेतना फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांच्या पुढाकारातून सोनई येथील तरुण पंढरपूर येथे स्वच्छता अभियान राबवण्यासाठी बसने रवाना झाले. यावेळी तरुणांसाठी उदयन गडाख यांनी मोफत बसेसचीही व्यवस्था केली एक जुलै रोजी सकाळी हे सर्व युवक मोठ्या उत्साहात बससमोर नारळ वाढवून सकाळी सात वाजता पंढरपूर येथे रवाना झाले.
पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राच्या बाहेरून वारकरी लाखोंच्या संख्येने येत असतात. आषाढी एकादशी झाली की वारकरी हे विठुरायाचे दर्शन घेऊन परतीच्या मार्गावर असताना पंढरपूर येथे तसेच चंद्रभागेच्या तिरी मोठे घाणीचे साम्राज्य होते. यामुळे चंद्रभागेचे पाणी दूषित होऊ नये व पंढरपुरात साचलेल्या कचऱ्यामुळे आरोग्य असे धोका पोहोचू नये म्हणून सोनई येथील तरुण हे पंढरपुराची स्वच्छता करण्यासाठी रवाना झाले. स्वच्छता अभियानासाठी निघालेल्या युवकांनी सांगितले की यावेळी आम्ही मंदिर परिसर, प्रदक्षिणामार्ग व गावातील साफसफाई करणार आहोत. तसेच यामध्ये प्लॅस्टिक पिशव्या , कागदांचा कचरा, द्रोण, ग्लास, केळीच्या साली, कुजलेले अन्न यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते परिणामी रोगराई पसरू नये म्हणून पंढरपूर येथे स्वच्छता करण्यात येणार आहे .
यावेळी सरपंच धनंजय वाघ, यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे सदस्य उदयराव पालवे ,संजय गर्जे, सुनील गडाख, प्रसाद हारकाळे,प्रताप येळवंडे, अशोक शेटे, सुधीर दरंदले, दत्ता काळे बल्लू जनवीर, निलेश बानकर यांचेसह यशवंत प्रतिष्ठान, आर्ट ऑफ लिव्हिंग ,युवा चेतना फाऊंडेशनचे अनेक तरुण सदस्य या उपक्रमात सहभागी होणार आहे यावेळी सोनई येथील युवकांनी उदयन गडाख यांनी बसचे नियोजन केल्यामुळे त्यांचे आभार मानले.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!