बुलढाणा (जनता आवाज वृत्तसेवा):- आज पहाटेच्या सुमारास बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा शहराजवळ झालेल्या बस भीषण अपघातात 25 जण प्रवासी हे बसला आग लागल्यामुळे होरपळून त्यांचा मृत्यू झाला.
मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघातस्थळाची पाहणी केली.
अपघातानंतर बसने पेट घेतला. काही वेळातच बसला आग लागली. लोकांना काही समजेपर्यंत २५ जणांना आपला जीव गमवावा लागला होता.
दरम्यान मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघातस्थळाची पाहणी केली. यावेळी शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
एकनाथ शिंदे म्हणाले, प्रत्यक्ष पाहिल्या नंतर अपघाताची भीषणता लक्षात येते. रात्री दिड वाजता हा अपघात घडला. गाडी खांबाला धडकली आणि डिजल टँकचा स्फोट झाला. गाडी पुढे घासत गेली आणि गाडीने पेट घेतला.जखमींवर चांगले उपचार करण्यात येतील. २५ लोकांना वाचवता आलं नाही. ही दुःखद घटना आहे. समृध्दीवरील जास्तीत जास्त अपघात मानवी चुकांमुळे झाले आहेत. चालकांना झोप लागल्यामुळे अपघात होतात. मात्र असे अपघात होऊन चालणार नाही, सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे.
यंत्रणा जाग्यावर पोहोचली होती. मात्र ट्रॅव्हल्सचा दरवाजा बंद होता. नाहीतर आणखी लोकांना वाचवता आले असते. फिटनेसमुळे काही गाड्या आम्ही वापस पाठवतो. चालकांचे समुपदेशन देखील होते. तरी देखील अपघात होऊ नये म्हणून सरकार सर्व गोष्टी करेल.
गेल्या तीन-चार महिन्यापासून समृद्धी महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे प्रशासन
आपल्या कोणत्या काही त्रुटी राहिले असेल त्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. अशी उपेक्षा जनतेमध्ये आहे.