१० वी आणि १२ वीच्या परिक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. डिप्लोमा प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून केंद्रीभूत ऑनलाईन प्रवेश नोंदणी अर्ज स्विकारले जात आहेत. काही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कागदपत्रांना होणाऱ्या दिरंगाईमुळे प्रथम वर्ष प्रवेश नोंदणीसाठी ता. . ७ जुलै पर्यंत ऑनलाईन प्रवेश नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच थेट द्वितीय वर्ष प्रवेशासाठी ता. ३ जूलै पर्यंत मुदत आहे.
पॉलिटेक्निक ऑनलाईन प्रवेशासाठी ७ जूलै पर्यंत मुदतवाढ
लोणी दि.१( जनता आवाज
वृत्तसेवा ):-महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने पॉलिटेक्निक मध्ये प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेश नोंदणी अर्ज भरण्यासाठी ता. ७ जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहीती प्राचार्य प्रा. डॉ. विजयकुमार राठी यांनी दिली.
पद्मश्री विखे पाटील पॉलिटेक्निक, लोणी येथे केंद्रीभूत ऑनलाईन प्रवेश सुविधा व मार्गदर्शन केंद्र सुरू असून या केंद्रामध्ये तज्ञ मार्गदर्शकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना प्रवेशासंबंधीची सविस्तर माहिती, नियम, ऑनलाईन ऑप्शन फॉर्म भरणे, पसंती क्रमांक देणे सहजसुलभ होणार आहे. प्रवेश सुविधा केंद्रासाठी स्वतंत्र अद्ययावत कक्ष स्थापन केला आहे. विद्यार्थ्यांनी माहितीसाठी प्राचार्य डॉ. विजयकुमार राठी ७७२२०९१२७७ व प्रा. वसिम तांबोळी ९०४९०८४७८६ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.