24 C
New York
Wednesday, August 6, 2025

Buy now

spot_img
spot_img

गोळीबाराच्या घटनेचा श्रीरामपूर येथे निषेध

श्रीरामपूर ( जनता आवाज
वृत्तसेवा ):-भीम आर्मी चीफ तथा आजाद समाज पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. चंद्रशेखर यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांकडून हल्ला करण्यात आला होता.त्याचा भीम आर्मी भारत एकता मिशन चे महाराष्ट्र प्रदेश प्रमुख संघटक दीपक भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली व आजाद समाज पार्टी युवा मोर्चा चे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते पँथर ऋषी पोळ यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर निषेध करण्यात आला.
या घटनेमध्ये चंद्रशेखर आजाद कमरेला गोळी घासून गेली. ते जखमी असल्यामुळे तेथील हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु आहेत.आता देशभर ठिकठिकाणी या घटनेचा निषेध नोंदवला जात आहे. अहमदनगर जिल्ह्यात संचारबंदी असल्यामुळे, प्रशासनाच्या अटी आणि शर्तीसह मोजक्याच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आंदोलनास परवानगी मिळाली. म्हणून श्रीरामपूर येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास “एक पेन, एक वहीची मानवानंदन देऊन” निषेध आंदोलन करण्यात आले.या वेळी जोरदार घोषणाबाजी करत अप्पर पोलीस अधीक्षक यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी जिल्हा सचिव साजिद शेख, जिल्हा कार्याध्यक्ष तथा राहाता तालुकाध्यक्ष शब्बीर कुरेशी, कविताताई पोळ, यशवंत पोळ, ममदापुर अध्यक्ष साजिद सय्यद, प्रवक्ते प्रतिनिधी गौरव भालेराव, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख प्रेम शेलार, भीम आर्मीच्या मुन्नाताई चावरे, अनिताताई म्हस्के, सुनीता म्हस्के, शिवाजी मुसमाडे, आकाश गायकवाड, समाधान पगारे, सनी वाघमारे व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!