श्रीरामपूर( जनता आवाज
वृत्तसेवा ):-शासन नियमानुसार श्रीरामपूर नगर परिषद आरोग्य विभागाने कत्तल खान्यातील जनावरांचा आरोग्य तपासणी व नोंद ठेवणे बंधनकारक असताना त्यानुसार रेकाॅर्ड ठेवले जात नाही. मुख्याधिकारी गणेश शिंदे यांची याबाबत भेट घेत त्यांना वस्तूस्थिती सांगितली असून त्यात सुधारणा न झाल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा विश्व हिंदू परिषद बजरंग दल दुर्गा वाहिनी जिल्हा संयोजिका सपनाताई थेटे यांनी दिला आहे.
नगरपरिषदचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले की,नगरपरिषदने जनतेच्या कररुपी पैशातून अधिकृत मटन मार्केट उभारले होते. त्यात शासनियमानुसार कत्तलीसाठी वापरणाऱ्या जनावरांची नोंद ठेवली जात असे.१० ते १५ वर्षांपासून मटन मार्केट बंद करून उघड्यावर जनावरांची कत्तल करून त्यांची कोणतीच नोंद श्रीरामपूर नगरपरिषदेच्या आरोग्य विभागात ठेवली जात नाही. तसेच कत्तली चे जनावरांची आरोग्य तपासणी न करताच कत्तल केली जाते.त्यामुळे कत्तल जनावर निरोगी आहे की रोगट आहे हे निष्पन्न होत नाही. रोगट जनावराची सुध्दा कत्तल होवून नागरीकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. तरी आरोग्य विभागाने शासननिर्णय योग्य सुचना करुन जनावरांची नोंद व आरोग्य तपासणी न केल्यास खुप मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्याचा इशारा विश्व हिंदू परिषद बजरंग दल दुर्गा वाहिनी जिल्हा संयोजिका सपनाताई थेटे यांनी दिला आहे.