24 C
New York
Thursday, August 7, 2025

Buy now

spot_img
spot_img

समृद्धी महामार्गावर बस अपघात, 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू

बुलढाणा( जनता आवाज

वृत्तसेवा):- समृद्धी महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच आहे. आज पहाटे सुमारास समृद्धी महामार्गावर बुलढाण्याजवळ पिंपळखुटा येथे विदर्भ ट्रॅव्हलचा भीषण अपघात झाला आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट डिव्हायडरला धडकली.

यानंतर ट्रॅव्हल्स बसने पेट घेतल्यामुळे २५ प्रवाशांचा जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाल्याची प्राथामिक माहिती आहे. सिंदखेडराजा परिसरात शुक्रवारी रात्री दोनच्या सुमारास ही घटना घडली. ही बस नागपूरहून पुण्याला जात होती. दरम्यान रात्री दोनच्या सुमारास बसचा भीषण अपघात झाला. आधी ही बस डिव्हाइडरला धडकली. नंतर लोखंडी पोलवर आदळून बस उलटली. त्यानंतर बसने पेट घेतला. या बसमध्ये एकूण 33 प्रवासी होते. अधिकतर प्रवासी यवतमा, वर्धा, नागपूर येथील होते. अपघातानंतर ८ प्रवासी खिडकीच्या काचा फोडून बाहेर आल्याने सुखरूप वाचले. घटनास्थळी पोलिस पथक तातडीने दाखल झाले आहेत. पोलिसांनी 25 प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढले असल्याची माहिती दिली आहे.
 अपघाताची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माहीत झाल्यानंतर त्यांनी तेथील स्थानिक कलेक्टर व आयजीसी दूरध्वनी येऊन संपर्क साधून घटनेची पूर्ण माहिती घेतली. यानंतर त्यांनी जखमी प्रवाशांना मोफत उपचार देण्यास सांगितले. व मृत प्रवाशांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!