मुंबई (जनता आवाज वृत्तसेवा:- एक वर्षांपूर्वी राज्यात सत्तांतर होऊन वर्षभर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं सांगण्यात येत होतं. मात्र सत्ता स्थापनेला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरही विस्तार करण्यात आलेला नाही. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खूशखबर दिली असून जुलै महिन्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
लवकरच जुलैत मंत्रिमंडळ विस्तार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘मंत्रिमंडळ विस्तार आम्हाला देखील करायचा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत निर्णय घेतील. मी विश्वासाने सांगतो की जुलै महिन्यामध्ये आम्ही मंत्रिमंडळ विस्तार करू.’
एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी रात्री उशिरा दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराचे सूत्र ठरले ची माहिती मिळालेली आहे. या बैठकीत विस्तारा ऐवजी इतर महत्त्वाच्या प्रश्नावर सुद्धा चर्चा झाली ची चर्चा होत आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की राज्याचे अनेक प्रश्न असताना त्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा लागतो. त्यासाठी दिल्लीत महत्वाची बैठक होती.