30.7 C
New York
Friday, August 15, 2025

Buy now

spot_img
spot_img

बाल गोकुळ अकॅडमी मध्ये पालखी व बालदिंडी सोहळा चैतन्यमय वातावरणात पडला पार

कोल्हार (जनता आवाज वृत्तसेवा):- बाल गोकुळ अकॅडमी कोल्हार बुद्रुक या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आषाढी एकादशी निमित्त शाळेतील बालगोपालांनी विठ्ठलरुक्मिणी ,संत ज्ञानेश्वर , मुक्ताबाई, वारकरी यांच्या वेशभूषा परिधान करून टाळ-मृदुंगाच्या गजरात विठूनामाचा जयघोष केला.

पायी दिंडी सोहळ्याच्या सुरुवातीला डॉक्टर जयरामजी खंडेलवाल,श्री ज्ञानेश्वर राऊत , शाळेचे संचालक सोन्याबापू मोरे व मुख्याध्यापिका सौ. शारदा मोरे, पालक प्रतिनिधी श्री गणेश हारदे यांच्या हस्ते पालखी मधील विठू माऊली व वेशभूषेतील विठ्ठल रुक्मिणी, (प्रथम गणेश देशमाने व प्राची संदीप तरकसे) चे पूजन व औक्षण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

शाळेतील चिमुरड्या विद्यार्थ्यांनी रिंगण सोहळा आणि पावली नृत्य विठू नामाच्या गजरात उपस्थित पालक व मान्यवर यांच्यासमोर सादर केले. याप्रसंगी उत्साही पालकांनी ,शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी पारंपारिक फुगडी खेळून चिमुरड्याच्या आनंदात भर घातली. कांदा मुळा भाजी अवघी विठू विठाई माझी , विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला या गजरात बाल गोकुळम अकॅडमी शाळा ते स्वामी समर्थ केंद्र कोल्हार बुद्रुक येथे पायी दिंडी विद्यार्थी पालक शिक्षक परिसरातील नागरिक व वारकरी या दिंडीत सहभागी होऊन आपला आनंद व्यक्त केला.स्वामी समर्थ केंद्र, कोल्हार बुद्रुक येथे विठू माऊली यांची पालखी व वेशभूषेतील विठ्ठल रुक्मिणी यांची दर्शन उपस्थितांना घडविण्यात आले.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!