शेवगाव( जनता आवाज वृत्तसेवा ):- ग्रामीण भागात अनेक अष्टपैलू खेळाडू दडलेले आहेत. क्रीडा स्पर्धाच्या माध्यमातून असे खेळाडू ओळखण्यास मदत होते. त्यामुळे या स्पर्धाकडे करिअरच्या वाटा म्हणून पहावे, क्रीडा स्पर्धाचे ग्रामीण भागात आयोजन हा एक विधायक व स्तुत्य उपक्रम आहे, असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
शेवगाव येथे खासदार सुजय विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष अमोल सागडे व बहुले बुद्रुक क्रिकेट क्लब यांच्या वतीने टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेतील विजेत्या संघास अहमदनगर येथे पारितोषिक समारंभ विखे यांच्या हस्ते झाले. यावेळी झालेल्या कार्यक्रमामध्य
ते बोलत होते. याप्रसंगी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, अर्थव पेट्रोलियमचे मालक अमोल सागडे, काकासाहेब जाधव, मनोज हरवणे, अण्णासाहेब राख, देविदास हारदास, आलिम शेख, महेश काळे, संदीप माने, अजित कबाडी आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी प्रथम विजेता नेवासा सेव्हन स्टार संघास चषक व ३१ हजार रुपये रोख रक्कम खासदार सुजय विखे यांच्या हस्ते देण्यात आली, तर बडुले क्रिक्रेट क्लब द्वितीय व हसनापूर क्रिकेट क्लब तृतीय पारितोषिकेचे मानकरी ठरले. २१ हजार, ११ हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल सागडे यांनी, तर आभार ज्ञानेश्वर काकडे यांनी मानले.



