लोणी दि.२६ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-राहाता तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदारसंघातील अतिशय महत्त्वाच्या तसेच प्रतिष्ठेच्या अशा दाढ बुद्रुक ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नकुल सुरेश तांबे यांची बिनविरोध निवड झाली.
शिर्डी विधानसभा मतदारसंघातील दाढ बुद्रुक ग्रामपंचायतीचा लोकनियुक्त सरपंच पदा सह सतरा सदस्यांसाठी निवडणूक प्रक्रिया नुकतीच संपन्न झाली. या निवडणुकीत महसुल व पशुसंवर्धन मंत्री तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, सौ शालिनीताई विखे पाटील, डाॅ.राजेंद्र विखे पाटील डॉ सुजय विखे पाटील यांना मानणाऱ्या जनसेवा मंडळाने सरपंच पदासह तेरा जागा जिकंत एकहाती मैदान मारले.
उपसरपंच पदाची निवडणूक लोकनियुक्त सरपंच श्री. तात्यासाहेब गवानाथ सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी उपसरपंच पदासाठी जनसेवा मंडळाकडून श्री. नकुल सुरेश तांबे यांनी अर्ज दाखल केला व त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी निवडणूक निरीक्षक म्हणून दळवी साहेब उप अभियंता लघु पाटबंधारे उपविभाग कोपरगाव यांनी काम पाहिले, तसेच ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी ग्रामविकास अधिकारी श्री. संजय गिऱ्हे यांनी व तलाठी श्री कानडे यांनी सहकार्य केले. यावेळी कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी लोणी पोलीस स्टेशनचे सहा पोलीस निरीक्षक श्री. युवराज आठरे, श्री. योगेश शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
सरपंच व उपसरपंच निवडीनंतर श्री. तात्यासाहेब गवानाथ सातपुते व श्री. नकुल सुरेश तांबे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. तर महसुल व पशुसंवर्धन मंत्री तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील ,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील,डाॅ.राजेंद्र विखे पाटील, खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दाढ बुद्रकचा विकास रथ दुप्पट वेगाने पुढे घेऊन जाण्याची ग्वाही नुतन सरपंच तात्यासाहेब गवनाथ सातपुते यांनी दिली आहे.
ही निवडणूक स्व. भारत दादा तांबे व स्व. देविचंद भाऊ भारत दादा पाटील तांबे यांच्या आशीर्वादामुळे आम्ही मोठ्या फरकाने जिंकू शकलो असे मत उपसरपंच नकुल तांबे यांनी व्यक्त केले.
या निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी कारखान्याचे माजी संचालक श्री. अशोकराव गाडेकर, उद्योजक श्री. सुनील तांबे, श्री. प्रल्हाद रंगनाथ तांबे, माजी सभापती श्री. सुभाषराव गाडेकर, श्री. सूरेश काका तांबे, श्री. बाळासाहेब तांबे, श्री. गंगाधर तांबे, श्री. भास्करराव तांबे, माजी उपसरपंच श्री. सुभाषराव तांबे, श्री. ज्ञानदेव माऊली बनसोडे, श्री. पांडुरंग कुमकर, श्री. लहानु दिघे, श्री. माशुम भाई, श्री हरिभाऊ तांबे, श्री. दादा गाडेकर, श्री. सुभाष दिवे, श्री. शिवाजी शिंदे, श्री. गवजी मोकळे, श्री रामदास तांबे, श्री. उत्तम तांबे, श्री. नुरभाई सय्यद, श्री. आप्पासाहेब तांबे, डॉ. दिपक तांबे, श्री. बाबूभाई शेख, श्री. योगेश तांबे( अध्यक्ष, श्रद्धा ग्रामविकास प्रतिष्ठान) श्री. मच्छिंद्र तांबे, श्री. दत्तात्रय गाडेकर, श्री. मच्छिंद्र गाडेकर, श्री. रवींद्र बनसोडे, श्री. रवींद्र वाणी, श्री. जितेंद्र माळवदे, श्री मधुकर तांबे, श्री. विलास कदम, श्री. द्वारकानाथ गाडेकर, श्री. भाऊसाहेब मकवाने, श्री. भारत साळवे, श्री. गणेश गाडेकर, श्री. शिवदास बनसोडे, श्री. भारत तांबे, श्री. बाळासाहेब पाळंदे, श्री. जॉन पाळंदे, तसेच विविध प्रतिष्ठान व संघटनांच्या युवकांनी या विजयात मोठा वाटा उचलला.
महसुल व पशुसंवर्धन मंत्री तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी सरपंच,उपसरपंच व इतर नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
जनतेला आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणार: सुनील भारतदादा तांबे
स्व भारत दादा तांबे पाटील व स्व देविचंद भाऊ तांबे पाटील यांच्या आशीर्वादाने आम्ही हा विजय मिळवु शकलो. गोरगरीब जनतेने दाखवलेला विश्वास निश्चित सार्थ ठरवू व आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध उपलब्ध करून देण्यावर भर देणार असल्याचे सुनील भारत पाटील तांबे यांनी सांगितले.
नवनिर्वाचित सदस्यांनी सर्वांना विश्वासात घेऊन लोकाभिमुख काम करावे: माजी संचालक अशोकराव गाडेकर
जनसेवा मंडळ दाढ बुद्रुक ला जनतेने भरभरून मतदान केले आहे व जनतेला असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नवनिर्वाचित सदस्यांनी सर्वांना विश्वासात घेऊन काम करावे.



