राहाता( जनता आवाज वृत्तसेवा ):-साकुरी (राहाता) येथील वॉर्ड क्रमांक एक मधील भगवा नगर महिला मंडळ यांचे वतीने आगळा वेगळा तुलसी विवाह पार पडला साकुरी वॉर्ड एक मधील रहिवाशी सौ नंदा अशोक थोरात यांचे पुढाकाराने हा विवाह सोहळा पार पडला.
सौ. थोरात या दरवर्षी आपल्या गल्ली मधील सर्व रहिवाशी हे मिळून आपल्या सर्व तुलसी एकत्र आणत सर्व तुलसी गल्ली मध्ये पारंपरिक पद्धतीने ज्या प्रमाणे विवाह होतात त्या पद्धतीने सर्व तुलसी गोळा करून साकुरी येथील ग्रामगुरु श्री रमण जोशी यांचे हस्ते हा विवाह सोहळा पार पडत असतो या वेळी गल्ली मधील सर्व वऱ्हाडी मंडळी यांना पारंपरिक पद्धतीचे दाळ बाटी जेवणाचे आयोजन करण्यात आले होते सदरील तुलसी विवाह पार पडला.
यावेळी सौ.नंदा थोरात,सौ.श्रद्धा थोरात,सौ.अर्चना थोरात,सौ.आश्विनी कुलथे,सौ.राणी जाधव,सौ.भक्ती जाधव,सौ. वैशाली जाधव ,प्रशांत थोरात,सागर थोरात,संदीप जाधव,यांनी अथक परिश्रम घेतले.



