दाढ (जनता आवाज वृत्तसेवा ):-भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत दाढ बुद्रुक यांच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून संविधान ग्रंथाचे पूजन करण्यात आले. संविधानच्या उद्देशिकेचे सामुहीक वाचनही करण्यात आले. माजी संचालक अशोकराव गाडेकर, उद्योजक सुनील भारतदादा तांबे, उपसरपंच नकुल तांबे, माजी संचालक चंपालाल पारधे , चांगदेव वाकचौरे, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बनसोडे, अनंता तांबे, प्रमोद बनसोडे, कानिफनाथ तांबे तसेच संजय गाडेकर, मल्हारी शिंदे, जॉन पाळंदे, आण्णासाहेब गाडेकर, बाळासाहेब पाळंदे, जितेंद्र माळवदे, संतोष वाणी, लक्ष्मणराव वाणी, सुभाष दिवे, बाळासाहेब दहिवळकर, मस्तान भाई, भाऊराव तांबे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
या वेळी बाळासाहेब पाळंदे यांनी प्रास्ताविक केले,भारतीय इतिहासातील ऐतिहासिक दिवस म्हणून संविधान दिनाची ओळख आहे. संविधानाने आपल्याला अधिकार व कर्तव्य दिलेली आहेत त्यांचे आपण सर्वांनी पालन करावे. याच दिवशी संविधानाचा मसूदा स्विकारला गेलेला दिवस देशात संविधान गौरव दीन म्हणून साजरा करणे हे प्रत्येक नागरीकाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी कानिफनाथ तांबे यांनीही मनोगत व्यक्त केले, त्यांनी मनोगत व्यक्त करताना अनेक देशांच्या संविधानाने दाखले देवून भारताचे संविधान कसे श्रेष्ठ आहे व आपल्या संविधानाने देशातील सर्व समूहाना एकत्रित गुंफण्याचे मोठे काम केले असल्याचे त्यांनी नमूद केले.
उपसरपंच नकुल तांबे यांनी मनोगत व्यक्त करून आभार मानले. संविधानाने प्रत्येक माणसाला अधिकार आणि कर्तव्य दिले असून, सर्वांनी अधिकारांची मागणी करत असताना कर्तव्यही तेवढयाच तत्परतेने पाळली पाहिजेत असे त्यांनी नमूद केले.
यानंतर फुले आंबेडकर सार्वजनिक वाचनालय येथेही भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून संविधानाचे पूजन करण्यात आले, तसेच फुले शाहू आंबेडकर स्मारक येथेही ग्रामस्थांच्या वतीने अभिवादन करण्यात आले यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



                                    