लोणी दि.२७( जनता आवाज वृत्तसेवा ):-लोणी येथील लोकनेते पद्यभुषन डॉ. बाळासाहेब विखे पाटील पद्मभूषण पदवीने सन्मानित प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था लोणी अंतर्गत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी लोणी येथे राष्ट्रीय औषध निर्माण शास्त्र सप्ताह विविध आरोग्य विषयक उपक्रम आयोजित करून साजरा करण्यात आली ची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र जाधव यांनी दिली आहे.
विद्यार्थ्यांनी आरोग्य विषयक जनजागरण फेरी, तसेच हसनापूर जिल्हा परिषद व उर्दू शाळा येथील मुलांची आरोग्य तपासणी करून त्यांना स्वच्छते विषयी मार्गदर्शन केले .याप्रसंगी द्वितीय वर्ष पदवी अभ्यासक्रमातील विद्यार्थिनी कुमारी अश्विनी खेमनर हिने फार्मसी क्षेत्राचे महत्त्व या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. या आरोग्य जनजागरण फेरीमध्ये पदविका व पदवी पदवी अभ्यासक्रमाचे सर्व विद्यार्थी, महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ. विशाल तांबे प्राध्यापक अर्चना राजदेव व प्राध्यापक अर्चना कदम यांनी विशेष परिश्रम घेतले.



