लोणी दि.२८( जनता आवाज वृत्तसेवा):-जिद्द आणि कठोर परिश्रमातून यशप्राप्तीही होत असते. प्रवरेचे नांव प्रवरा शैक्षणिक संकुळामुळे जागतिक पातळीवर पोहचत आहे हा आनंद मोठा असून शेतक-याचा मुलगा ही जागतिक उद्योजक होऊ शकतो. हा प्रवास ग्रामीण विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन महसुल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब
विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचा प्रवरा माध्यमिक विद्यालय,दुर्गापूर आणि पद्यश्री विखे पाटील महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आणि प्रवरा परिसरातील दुर्गापूर येथील सुनिल रमेश पुलाटे, श्री.दिपक उपाध्याय आणि श्री हरी नायर च्या बेरीओ लॉजीस्टीक इंडीया प्रा. ली. मुंबई येथील कार्यालयाच्या शुभारंभ प्रसंगी ना. विखे पाटील बोलत होते. यावेळी ठाण्याचे जिल्हाधिकारी श्री.अशोक शिनगारे, जेष्ठ विधी तज्ञ अँड. आर. बी. पुलाटे, विखे पाटील कारखान्याचे माजी उपाध्याक्ष श्री. कैलासनाना तांबे, प्रवरा, बँकेचे माजी संचालक छगणराव पुलाटे,रमेशराव पुलाटे, उद्योजक अशितोष पुलाटे, दिलीप पुलाटे आणि यांच्यासह कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनात ना. विखे पाटील म्हणाले, शेतक-याचा मुलगा आज जागतिक पातळीवर उद्योजक होऊन रोजगार निर्मीती करतो हा आनंद मोठा आहे. प्रवरा शैक्षणिक संकुलातून बाहेर पडणारे विद्यार्थी हे प्रवरा परिसराचा लौकीक वाढवत आहे हेच स्वप्न पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील यांचे होते. आज ते सुनिल पुलाटे आणि टिमने पूर्ण केले असे सांगून शुभेच्छा दिल्या.
यावेळी सुनिल पुलाटे यांनी कंपनीचा आढावा घेत देश विदेशात सेवा सुरु असून २०१४ मध्ये स्थापना झालेली ही कंपनी विविध देशात प्रामाणिकपणे सेवा देत दोनशे कोटीची उलाढाल असून २५० जणांना रोजगार दिला आहे.. यासाठी प्रवरा परिवार आपल्यासाठी आयडॉल असल्याचे सांगितले.
सलाम जिद्दीला….
दुर्गापूर सारख्या ग्रामीण भागातून प्रवरा शैक्षणिक संकुलात शिक्षण घेतलेल्या सुनिल ने अनेक चढ-उतार पाहिले परंतु काहीतरी करायचे या जिद्दीतून त्याने प्रवरेत वाणिज्य शाखेची पदवी घेत नोकरी केली.नोकरी सोबत एम.बी.ए उत्पादन ते मार्केटींगमध्ये केली आणि नोकरीपेक्षा आत्मनिर्भर होण्यासाठी सुरु केली धडपड सुरु करुन आज जागतिक पातळीवर पोहचला आले.ग्रामीण तरुणांना मोठी संधी आहे.हा संदेश सुनिलने कृतीतून दिला.