लोणी दि.२९ ( जनता आवाज वृत्तसेवा ):–लोकनेते पद्यभुषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी वेदांत पवार यांची एम.एस्सी. इंटरनॅशनल बिजनेस, लिवरपूल युनिवर्सिटी,युनायटेड किंगडम व हिमांशू पटेल एम.बी.ए. लीडरशिप, वेस्ट ऑफ स्कॉटलंड युनिवर्सिटी,लंडन या ठिकाणी उच्च शिक्षणासाठी परदेशात निवड झाली असल्याची माहिती कृषी व कृषी सलग्ननित महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. शुभांगी साळोखे यांनी दिली .
महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा यासाठी कृषी महाविद्यालय, लोणी विविध उपक्रम राबवत असते. त्यामध्ये व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा, मान्यवर व्यक्ती मार्गदर्शन व्याख्याने, कृषी आधारित औद्योगिक कंपनी भेटी , कार्यानुभव उपक्रम इ. उपक्रमाचा समावेश होतो.
सदर विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंञी आण्णासाहेब म्हस्के, जिल्हा परिषदेच्या माजी अध्याक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेचे अतिरिक्त मुख्य कार्यकरी अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे आणि सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.



