spot_img
spot_img

लोणीत प्रवरा शैक्षणिक संकुलाच्या वतीने दोन दिवसीय विज्ञान,गणित आणि कला प्रदर्शनाचे २०२३ चे आयोजन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील यांच्या वाढदिवसांनिमित्त उपक्रम..

लोणी दि.३०( जनता आवाज वृत्तसेवा ):-लोकनेते पद्यभुषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने जिल्ह्य परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लोणीच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर माध्यामिक विद्यालय येथे संस्था अंतर्गत दोन दिवसीय विज्ञान,गणित आणि कला प्रदर्शन २०२३ चे आयोजन शुक्रवार दि १ डिसेबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता करण्यात आल्याची माहीती संस्थेच्या शिक्षण संचालिका सौ. लिलावली सरोदे यांनी दिली.

संस्थे अंतर्गत होणा-या या विज्ञान, गणित आणि कला प्रदर्शनामध्ये इयत्ता पहीली ते इयत्ता बारावीचे विद्यार्थी सहभागी होणार असून याद्वारे आरोग्य, जीवन प्रणाली, पर्यावरण संवर्धन, शेती तंत्रज्ञान, बदलते हवामान, जमीन आरोग्य, निसर्ग- पर्यावरण संवर्धन, माहीती तंत्रज्ञान, अंतराळ विज्ञान, दळण-वळण, महाराष्ट्रातील गडे किल्ले, भारतीय संस्कृती आदीविषयी विविध विज्ञान प्रयोग, पोस्टर प्रदर्शन, निंबध स्पर्धा होणार आहेत.

प्रदर्शनाचा शुभारंभ जिल्ध परिषदेच्य माजी अध्यक्षा सौ. शालीनीलाई विखे पाटील यांच्या हस्ते होणार असून यावेळी राहाता पंचायत समितीचे गटविकास अधिकार जालीधर पठारे, गटशिक्षणाधिकारी राजेश पावसे, संस्थेचे सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, अतांत्रिकचे संचालक डॉ. प्रदिप दिघे, लोणी येथील विविध संस्थाचे पदाधिकारी यांच्या उपस्थित होणार असून बक्षीस वितरण शनीवार दि. २ डिसेंबर २०२३ रोजी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या उपस्थित होणार आहे, दोन दिवसीय या विज्ञान, गणित आणि कला प्रदर्शन २०२४ मध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन सौ. सरोदे यांनी केले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!