पुणे (जनता आवाज वृत्तसेवा ):- अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये लव जिहाद, उच्चशिक्षित मुलींना फूस लावून पळून नेणे, अल्पवयीन मुलींवर अत्याचार असे अनेक प्रकार घडत आहे. असाच प्रकार आज पुण्यातील मध्यवर्ती भागातील सदाशिव पेठ या ठिकाणी एकतर्फी प्रेमाच्या वादातून एका तरुणानी 24 वर्षीय तरुणीवर भरदिवसा कोयत्याने वार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
पुण्यातील सदाशिव पेठेत तरुणीवर कोयत्याने वार, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
मात्र वेळीच दोन तरुणांनी हल्लेखोर तरुणाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याने मुलीचा जीव वाचला आहे. याप्रकरणी पेरुगेट पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.संबंधित तरुणीला वाचणारा स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी यशपाल जवळगे यानी सांगितले की, सदाशिव पेठेतील भरत नाट्य मंदिराजवळ रस्त्याने एक तरुणी’ मला वाचवा, मला वाचवा ‘ म्हणून ओरडत जात होती. तिच्या पाठीमागे आरोपी तरुण हा कोयता हातात घेऊन पळत होता. नागपूर हॉटेल जवळ सदर तरुणीवर त्यानी एक तिच्यावर वार केला. त्यानंतर तरुणी पुढे पळत आल्यानंतर कॅनरा बँकेच्या चौकात तो तिच्या पाठीमागे जोरात धावू लागला.
त्यानंतर जवळील स्वीट मार्ट दुकानपाशी त्याने तरुणीला पकडून खाली पाडले. त्यानंतर तो कोयता हातात घेऊन तरुणीच्या डोक्यात वार करणार होता. मात्र, त्याचवेळी त्यास मी पकडले आणि त्याला हल्ला करण्यापासून रोखले. यावेळी आणखी एक तरुण माझ्या मदतीला आला आणि त्यानी आरोपी तरुणाच्या हातातील कोयता बाजूला केला. त्यानंतर संबंधित तरुणाला पेरुगेट पोलीस चौकीत पोलिसांकडे आम्ही स्वाधीन केले आहे.
मात्र, भरवस्तीत सदाशिव पेठ सारख्या ठिकाणी अशा प्रकारे एखाद्या तरुणीला मारण्यासाठी हातात कोयता घेऊन तरुण धावत असताना तरुणीला वाचवण्यासाठी कोणी पुढे आले नाही ही बाब लज्जास्पद आहे. समाज केवळ अशावेळी बघायची भूमिका घेतो ही बाब चिंताजनक असल्याचे मत त्यानी व्यक्त केले. अशा प्रकारचे घटना घडत असल्यामुळे महिला वर्गामध्ये दहशतचे वातावरण निर्माण झाले असून त्यामुळे महाराष्ट्रातील गृह खाते याकडे कशाप्रकारे पाहते. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जातीने लक्ष घालावे अशी महाराष्ट्राची जनता उपेक्षा करत आहे.