नगर (जनता आवाज वृत्तसेवा ):-टी-२० क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या संलग्नतेखाली टी-२०क्रिकेट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र याच्यातर्फे आयोजित आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद (संभाजीनगर) येथे दि. २६ व २७ नोव्हें.२०२३, रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र निवड चाचणीवेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज ऑफ इंजिनियरींग नेप्ती, अहमदनगरचा संघ ज्युनिअर व सिनिअर अश्या दोन निवडीकरीता दाखल झाला होते. यामधील निवड चाचणीत ज्युनिअर संघामधून प्रथमेश सतिष भालशिंग (ऑल-राउंडर), तर सिनिअर संघातुन अरबाज इब्राईम शेख (बॉलर), तुषार संदीप आरवडे (ऑल-राउंडर) आणि दिनेश निलेश ससे (किपर व बॅट्स्-मन) म्हणून या खेळाडूंची महाराष्ट्र राज्य टी-२० लेदरबॉल क्रिकेट संघात निवड झाली आहे. सदर संघ हा दि. १६ ते २१ डिसें.२०२३ दरम्यान गोवा येथे होत असलेल्या राष्ट्रीय स्पर्धा करिता महाराष्ट्र टी-२० लेदरबॉल क्रिकेट संघात सामिल होणार आहे.
सर्व निवड झालेल्या खेळाडूंचे महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. वाय. आर. खर्डे सर यांच्या तर्फे सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांकडून खेळाडू वृत्ती जपली आणि जोपासली जाण्यासाठी महाविद्यालय खेळासाठी कायमच प्रयत्नशील राहील, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. वाय. आर. खर्डे सर यांनी केले.
खेळाडूंना महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा.अविनाश हंडाळ यांचे मार्गदशन मिळाले. याचबरोबर संस्था स्तरावरून अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज चे अध्यक्ष. मा.श्री.रा.ह.दरे साहेब, सचिव मा.श्री. जी.डी.खानदेशे साहेब व संस्था सदस्य-पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वाय.आर.खर्डे सर, सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने कौतुक व अभिनंदन केले जात आहे. या कार्यक्रमास प्रा. पी. जी. निकम, प्रा. एस. एम. वाळके, डॉ. एम. के. भोसले, प्रा. व्ही. व्ही. जगताप, प्रा. ए. बी. काळे, प्रा. ए. एस. कांबळे, प्रा. एस. ए. वणवे, प्रा. एस. पी. सुरोशी यांच्याबरोबर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.