लोणी दि.३०( जनता आवाज वृत्तसेवा ):-भारतात प्राचीन काळी विकसित झालेले आयुष्याबद्दलचे ज्ञान व त्याच्या उपयोगाने आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य प्राप्त होऊ शकणारे शास्त्र म्हणजे आयुर्वेद. व्यक्तीचे आरोग्य राखणे व रोगी व्यक्तीच्या रोगांचे निर्मूलन करणे हे आयुर्वेदाचे ध्येय. बालकांपासून तरुण आबाल वृद्धांपर्यंत रोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नियमित आहार व्यायाम व आरोग्य प्रति जागरूकता महत्त्वाची आहे.
नवजातबालकांपासून ते १६ वर्षा पर्यंतच्या बालकांसाठी सुवर्णप्राशन संस्कार मुलांना सदृढ,निरोगी व तेजस्वी बनविण्याचा आयुर्वेदिक उपाय अतिशय उपयुक्त आहे सुवर्णप्राशन बालकास आजारांपासून कवचा सारखे काम करते त्यामुळे ते आरोग्यदायी व अमृताप्रमाणे ठरते पुष्प नक्षत्रातील सुवर्णप्राशन बालकाची शारीरिक मानसिक व बौद्धिक क्षमता वाढविण्यास सर्वोत्तम आहे.
संस्थेचे अध्यक्ष ना राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुप्रियाताई ढोकणे पाटील यांच्या मार्गदर्शनखाली संस्थेच्या वतीने मागील काही दिवसापासून मोफत आरोग्य विषयक शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने संस्थेच्या विश्वस्त सौ. शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पायरेन्सच्या डॉ. विखे पाटील मेमोरियल आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर चंद्रापूर (लोणी) यांच्यावतीने मोफत बालयोग व सुवर्णप्राशन संस्कार शिबिर शनीवार दि २ डिसेंबर आणि शुक्रवार दि. २९ डिसेंबर या दिवशी आयोजित केलेले आहे तरी परिसरातील एक दिवस ते सोळा वर्षे या वयोगटातील बालकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन पायरेन्सचे सचिव व संचालक डॉ निलेश बनकर यांनी केले आहे.