लोणी दि.१( जनता आवाज वृत्तसेवा ):-प्रवरेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या उपजत कला गुणांना संघी देण्याचे काम नेहमीचं होत असते. विद्यार्थ्यांच्या कल्पतेला वाव देतांनाच यातून विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळून त्यांचा आत्मविश्वास वाढतो असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील यांनी केले.
लोकनेते पद्यभुषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने जिल्ह्य परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि विश्वस्त सौ. शालीनीताई विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लोणीच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर माध्यामिक विद्यालय येथे संस्था अंतर्गत दोन दिवसीय विज्ञान,गणित आणि कला प्रदर्शन २०२३ च्या शुभारंभ प्रसंगी सौ.विखे पाटील बोलत होत्या.यावेळी माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील,भाजपाच्या महीला अध्यक्षा सौ.कांचनताई मांढरे,रोहीणीताई निघुते,शोभा घोरपडे,भाऊसाहेब ज-हाड,प्रवरा बॅकेचे माजी संचालक किसनराव विखे,तंटा मुक्तीचे अध्यक्ष संपतराव विखे, सेवा संस्थेचे अध्यक्ष अशोकराव धावणे, सरपंच कल्पनाताई मैड, माजी सरपंच अनिल विखे,राहाता पंचायत समितीचे गटविकास अधिकार जालिदर पठारे, गटशिक्षणाधिकारी राजेश पावसे, संस्थेचे सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, अतांत्रिकचे संचालक डॉ. प्रदिप दिघे आदी मतदार संघातील विविध संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना सौ.विखे पाटील म्हणाल्या,आपण दिलेल्या शुभेच्छा यांतून समाजकार्याची प्रेरणा मिळते.आज विविध उपक्रमातून जनतेची प्रश्न सोडवितांना त्यांच्या सुख दु:खामध्ये सहभागी होता येते.मतदार संघ विखे पाटील परिवारांचे कुटुंब आहे. असे सांगून कायम जनतेची सेवा करत राहू असे सांगितले.
या विज्ञान, गणित आणि कला प्रदर्शनामध्ये इयत्ता पहीली ते इयत्ता बारावीचे विद्यार्थी सहभागी होणार असून याद्वारे आरोग्य, जीवन प्रणाली, पर्यावरण संवर्धन, शेती तंत्रज्ञान, बदलते हवामान, जमीन आरोग्य, निसर्ग- पर्यावरण संवर्धन, माहीती तंत्रज्ञान, अंतराळ विज्ञान, दळण-वळण, महाराष्ट्रातील गडे किल्ले, भारतीय संस्कृती आदीविषयी विविध विज्ञान प्रयोग, पोस्टर प्रदर्शनात संस्थेची प्राथमिक,माध्यमिक आणि कनिष्ठ अशा चार गटातून प्रदर्शनामध्ये २५० विविध उपकरणे आणि कलाकृती ठेवण्यात आल्या आहे. बक्षीस वितरण शनीवार दि. २ डिसेंबर २०२३ रोजी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या उपस्थित होणार आहे.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविक शिक्षण समन्वयक प्रा. नंदकुमार दळे यांनी करत उपक्रमाची माहीती माही दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजय देशमुख आणि संजय उंबरकर यांनी केले.
सौ.शालीनीताई विखे पाटील यांच्या वाढदिवसांनिमित्त जिल्हात आणि मतदार संघातील विविध मान्यवरांनी शुभेच्छा देतांना विद्यार्थ्याना शालेय साहीत्य,वृक्षारोपण यासह आरोग्य जनजागृतीचे कार्यक्रमाचे आयोजन करुन शुभेच्छा.