पारनेर दि.२( जनता आवाज वृत्तसेवा ):-शासनाच्या योजना ह्या जनततेसाठी असतात.योजनांचा लाभ लाभार्थीना देण्याची जबाबदारी अधिकार्यांची आहे.योजनेचा लाभ मिळत नाही किंवा अधिकार्यांच्या हलगर्जीपणाने शासनाची बदनामी होणार असेल तर संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना कारवाईस सामोरे जावे लागेल.विनाकारण शासनाची बदनामी खपवून घेणार नसल्याचा इशारा महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.
पारनेर येथे शासन आपल्या दारी उपक्रमाचे आयोजन मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते.प्रांरभी विविध योजनांच्या लाभार्थीना पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
मंत्री विखे पाटील यांनी जलजीवन योजनांचा आढावा घेतला.तालुक्यात सुरू असलेल्या सर्व योजनांमध्ये मोठ्या तक्रारी करण्यात आल्या पाण्याचे उद्भव न पाहातच योजनांची काम सुरू केल्याचे गांभीर्य लक्षात घेवून मंत्री विखे पाटील यांनी तहसिलदार आणि गटविकास अधिकारी यांनी योजना सुरू असलेल्या गावात ग्रामसभा घेवून योजनेतील त्रृटी जाणून घेण्याचे आदेश दिले.
वीज वितरण कंपनीकडून रोहीत्र उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या.याबाबत वितरण कंपनीच्या अधिकार्यांनी दोन ते तीन दिवसात मागणीप्रमाणे गावांचे सर्वेक्षण करून रोहीत्रांची उपलब्धता करून देण्याच्या सूचना विखे पाटील यांनी दिल्या.घरगुती ग्राहकांना येत असलेल्या वाढीव बीलांच्या बाबत अधिकार्यांनी सुरूवातीला आलले सरासरी बील भरून घेण्यास सांगितले.
पानंद व शेतशिवार रस्ते अद्यापही अतिक्रमण मुक्त न झाल्याची गंभीर दखल घेत मंत्र्यानी तहसिलदारांना तातडीने मोजणी करून या रसत्यांची काम पूर्ण करण्यास सांगितले.
खरैदी विक्री विभागात गाळ्याची नोंद करण्यासाठी महसूल विभागतील कर्मचार्यांने एक लाख रुपये घेतल्याची तक्रार जाहीरपणे करण्यात आली.याबबात मंत्री विखे पाटील यांनी अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांना चौकशी करण्याचे आदेश दिले.शासकीय कार्यालयात अडवणूक होत असेल तर थेट माझ्याशी संपर्क करावा असेही त्यांनी सूचित केले.स्थानिक पदाधिकार्यांनी याबाबत जागृत राहण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
या बैठकीत मार्गदर्शन करताना विखे पाटील म्हणाले की शासन आपल्या दारी उपक्रमातून लोकांना योजनांचा लाभ देण्याचे काम झाले पाहीजे.राज्यात जनतेच्या मनातील सरकार असल्याने त्यांच्या हिताची काम होत आहेत.पण लाभ मिळावा म्हणून कार्यालयात हेलपाटे मारायला लावू नका योजना अभावी शासनाची बदनामी होत असेल तर ते गंभीर आहे.कारवाई करण्यास भाग पाडू नका असा इशारा त्यांनी दिला.
राज्यात मागील अडीच वर्षाचा कारभार फक्त फेसबुकवर होता आमचे सरकार लोकांच्या दारात जावून योजनांचा लाभ देत आहे.सरकार मजबूत असून विरोधकांच्या केवळ वल्गना असल्याची टिका त्यांनी केली.याप्रसंगी विश्वनाथ कोरडे तालुका अध्यक्ष राहुल शिंदे काशिनाथ दाते सचिन वराळ अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.