लोणी (जनता आवाज वृत्तसेवा ):-लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधिने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेअंतर्गत आयोजित केलेल्या विज्ञान-गणित प्रदर्शन २०२३-२४ मध्ये प्रवरा पब्लिक स्कूलने घवघवीत यश संपादन केले. अशी माहिती शाळेचे प्राचार्य डॉ. बी बी अंबाडे यांनी दिली.
दि. १ डिसेंबर ते २ डिसेंबर २०२३ या कालावधीत आयोजित संस्थांतर्गत विज्ञान व गणित प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या शुभहस्ते झाले. त्यांनी आपल्या भाषणातून सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या व विज्ञान तंत्रज्ञानाचे महत्त्व विशद केले.
हे प्रदर्शन इयत्ता पहिली ते चौथी, इयत्ता पाचवी ते आठवी व इयत्ता नववी ते बारावी अशा एकूण तीन गटात आयोजित केले होते. दोन दिवस चाललेल्या या प्रदर्शनात विज्ञान विषयात इयत्ता नववी ते बारावी गटात घुगे हर्षवर्धन हरिदास याने प्रथम क्रमांक पटकावला व इलंडेसरी श्रेयश राजा याने तृतीय क्रमांक मिळवला. तर गणित विषयात इयत्ता पाचवी ते आठवी गटात कु.दिवटे गीता निलेश हिने द्वितीय क्रमांक पटकावला तर इयत्ता नववी ते बारावी गटात कु. विखे सान्वी समीर हिस प्रथम क्रमांक मिळाला. प्रवरा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या उपकरणांनी पुन्हा एकदा आपले वेगळेपण सिद्ध केले.
दिनांक २ डिसेंबर २०२३ रोजी विज्ञान-गणित प्रदर्शनाचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. यशस्वी विजेत्या स्पर्धकांना महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री श्री. अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्यासमवेत संस्थेच्या शिक्षण संचालिका सौ. लीलावती सरोदे व समन्वयक श्री. नंदकुमार दळे हे ही उपस्थित होते.
प्रवरा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील,सौ शालिनीताई विखे पाटील,संस्थेच्या सी ई ओ डॉ. सुश्मिता विखे,अतिरिक्त सी ई ओ डॉ. शिवानंद हिरेमठ या मान्यवरांनी विशेष कौतुक केले.
यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे प्राचार्य डॉ. बी बी अंबाडे, उपप्राचार्य श्री. के टी अडसूळ, पर्यवेक्षिका सौ. एम एस जगधने,सौ.शुभांगी रत्नपारखी,विज्ञान विभागाचे श्री. डी डी अरंगळे,श्री वाय एम दिघे, सौ.व्ही के आहेर व गणित विभागाचे श्री. एम आर घोगरे व सौ. कलामूर्ती यांचे मार्गदर्शन लाभले.