श्रीरामपूर(जनता आवाज वृत्तसेवा):-श्रीरामपूर शहरातिल हनुमान मंदिर येथे दि. २५ जून रोज़ी राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांच्या वाढदिवसा निमित्त सकल हिंदू समाज तसेच सर्व रामभक्त कार्यकर्ते यांच्या वतीने महाआरतीचे आयोजन करण्यात येऊन गो शाळेमध्ये गोवंशीय जनावरांना चारा दान करण्यात आला.
आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने मोठे कार्यक्रम व फ़्लेक्स बोर्ड यावर आनाठायी ख़र्च करु नये अशी विनंती सागर बेग यांनी केली होती. त्यास श्रीराम भक्तांनी प्रतिसाद देत अनेक अशा कार्यक्रमांना फाटा देऊन बेलापूर येथिल महेशजी व्यास यांच्या गो शाळेमधे जाऊन गोवंशीय जनावरांना चारा दान केला. या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.
दरम्यान वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित हनुमान मंदिरातिल महाआरतीनंतर श्रीराम भक्तांसमोर मनोगत व्यक्त करताना आकाश बेग म्हणाले की, आम्ही श्रीरामपूर तालुका व परिसरात धर्म कार्यासाठी झिजण्याचे काम करत आहोत. कुठल्याही वैयक्तिक स्वार्थासाठी ही आमची लढाई नाही. तरीही काही राजकीय पक्षाचे पुढारी व नेते मंडळी आपली स्वतःची राजकीय पोळी भाजन्यासाठी आमच्यावर टीकाटिप्पणी करण्याचे काम करत आहेत.
वास्तविकपणे आमच्यावर खालच्या भाषेत टीका करण्यापेक्षा त्यांनी श्रीरामपूर शहर व तालुक्यातील हिंदू समाज बांधवांसाठी काय काम केले हे सांगावे.केवळ कुठल्याही एका समाजाचे केवळ मतांच्या लाचारीसाठी लांगुलचालन करण्याचे काम त्यांनी करू नये.हिंदू धर्मा रक्षण करणाऱ्यांवर केवळ व्यक्तिद्वेषापोटी जर कोणी टीका करत असेल तर त्याला त्याच्याच भाषेत यापुढे उत्तर दिले जाईल. मुळातच लोकप्रतिनिधीने असा आकस ठेवणे योग्य नाही.कोणत्याही एका समाजाची ग़ुलामगिरी त्यांनी करू नये.
हिंदू समाज आता जागृत होत चालेला आहे., कोणी त्याला रोखु शकत नाही.धर्मासाठी काम करणारे हे कार्यकर्ते व हिंदू समाज धर्मप्रेमी येणाऱ्या निवडणुकीत त्यांना नक्कीच आपली ताकद दाखवून देतील,असा इशाराही बेग यांनी शेवटी दिला. हनुमान मंदिरामधे या महाआरतीमूळे राजकीय वातावरान ढवळून निघाले आहे.यावेळी महाआरतीला व शुभेछ्या देन्याकरिता शेकडोच्या संखेने कार्यकर्ते उपस्थित होते.