11.7 C
New York
Sunday, November 24, 2024

Buy now

spot_img
spot_img

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या विधानसभेत उपस्थित करू – आ.तनपुरे

राहुरी ( जनता आवाज वृत्तसेवा ):-अंगणवाडी कर्मचा-यांच्या विविध मागण्या त्यांचे प्रश्न आपण विधान सभेत उपस्थित करून त्यांना न्याय मिळवून देण्याचा निश्चित प्रयत्न करू असा विश्वास आमदार प्राजक्त तनपुरे यांनी तालुक्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस यांना दिले.

या संपात राज्यभरातील अंगणवाडी कर्मचारी सहभागी होणार आहेत. सबब शासनाने अंगणवाडी कर्मचा-यांच्या विविध न्याय प्रश्नांची तातडीने सोडवणुक न केल्याने दि. ०४/१२/२०२३ पासुन राज्यातील सर्व अंगणवाडी कर्मचारी हे बेमुदत संपावर जाणार असल्याची नोटीस व निवेदन शासनास व आमदार प्राजक्त तनपुरे यांना देण्यात आले.यावेळी माजी नगराध्यक्षा डॉ सौ उषाताई तनपुरे, सौ सोनालीताई प्राजक्त तनपुरे उपस्थित होत्या.

राज्यातील अंगणवाडी कर्मचा-यांना शासकीय कर्मचा-यांचा दर्जा द्यावा, सन्मानजनक वेतनवाढ, दरमहा पेन्शन यासह विविध मागण्यांची सोडवणुक करिता गेली अनेक महिन्यापासुन राज्यभर आंदोलने सुरु होती. राज्य शासन व प्रशासनाशी वारंवार बैठका होवुन चर्चा ही करण्यात आलेली होती.

परंतु मागण्यांची सोडवणुक करणे ऐवजी राज्य सरकार त्याकडे जाणीवपुर्वक करत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृति समितीच्या वतीने दि. ०४/१२/२०२३ पासुन राज्यभर बेमुदत संप जाहीर केलेला आहे. तसेच माहे नोव्हेंबर २०२३ या महिन्यातील कुठल्याही प्रकारची माहिती, अहवाल देणे तसेच मासिक बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय कृती समितीचे घेतलेला आहे.तरी आपण या पत्रासोबत जोडलेल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी वृती समितीच्या निवेदनातील मागण्यांना पाठींबा यावा व ७ डिसेंबर पासून सुरु होणाऱ्या नागपूर हिवाळी अधिवेशनात अंगणवाडी कर्मचाऱ्याचे सोबतच्या निवेदनातील प्रश्न उपस्थितीत करून विधान सभेत या मागण्या बाबत प्रश्न उपस्थित करून आवाज उठवावा अशी आम्ही आपणास विनंती करीत आहोत.

उपस्थित अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी डॉ सौ उषाताई तनपुरे व सौ सोनालीताई तनपुरे यांचे बरोबर आपल्या विविध मागण्या अडचणी समस्या मांडल्या.

यावेळी कॉ. मदिना शेख अध्यक्ष कॉ. राजेंद्र बावके सरचिटणीस,कॉ. जीवन सुरुडे सहचिटणीस,शरद संसारे जिल्हा उपाध्यक्ष,शिल्पा देशमुख , संगीता डोंगरे, सुनीता धसाळ, सुजाता शिंदे, भागीरथी पवार, मालन माळी,शोभा पवार आदि सह तालुक्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस उपस्थित होत्या.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!