राहाता दि३ ( जनता आवाज वृत्तसेवा):- रब्बी हंगामा करिता शेतीसाठी दोन तर उन्हाळ्यात पिण्याचे पाण्यासाठी एक असे मिळून तीन आवर्तने गोदावरी उजव्या कालव्यांना सोडण्यात येणार आहे त्यातील रब्बीचे पहिले आवर्तन जानेवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात सोडण्याचा निर्णय करतानाच निळवंडे लाभ क्षेत्रातील शेवटच्या गावाला पाणी देण्याची ग्वाही महसूल पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
गोदावरी कालव्यांना आगामी रब्बी हंगाम व उन्हाळ्यात पिण्याचे पाण्याचे आवर्तन सोडण्या संदर्भात राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गोदावरी व निळवंडे पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांची बैठक संपन्न झाली या बैठकीस भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड रघुनाथ बोठे राहाता तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानदेव गोंदकर माजी सभापती भाऊसाहेब जेजुरकर माजी नगराध्यक्ष सोपानकाका सदाफळ ज्येष्ठ नेते मोहनराव सदाफळ तसेच गोदावरी कालवा विभागाचे अधिक्षक अभियंता महेश आंबरे कार्यकारी अभियंता श्रीमती सोनल शहाणे निळवंडे पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे कार्यकारी अभियंता ठाकरे अभियंता स्वप्निल काळे शिर्डीचे प्रांताधिकारी माणिक आहेर तहसीलदार अमोल मोरे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की धरणातील उपलब्ध पाणी साठ्याची क्षमता बघता रब्बी हंगामातील पिके घेण्यासाठी शेतीचे दोन आवर्तने तर उन्हाळ्यात पिण्यासाठी पाण्याचे एक आवर्तन सोडले जाईल काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने सध्या लगेच पाण्याची आवश्यकता भासत नाही त्यामुळे रब्बी साठीचे पहिले आवर्तन जानेवारी महिन्याचे पहिल्या आठवड्यात सोडू त्यानंतर दुसरे आवर्तन संभाव्य परिस्थिती बघता किती दिवसाच्या अंतराने सोडता येईल व त्याचा शेतकरी बांधवांना कसा जास्तीत जास्त फायदा होईल याचा विचार करून पाणी सोडण्याचा विचार या बैठकीत झाला.
मार्च एप्रिलच्या दरम्यान पिण्याचे आवर्तन सोडता येईल व त्यानंतर धरणातील उर्वरित पाण्याची परिस्थिती पाहून पुन्हा एखादे आवर्तन देणे शक्य आहे का ॽ याचाही विचार करून अधिकार्यांनी नियोजन करतानाच, मिळणाऱ्या आवर्तनातून शेतकऱ्यांनी सुव्यवस्थित योग्य पद्धतीने नियोजन करून पाण्याचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.
अधिकाऱ्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने नियोजन करून निळवंडे कालव्यां द्वारे शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल अभिनंदन करून मंत्री विखे पाटील म्हणाले पकी, त्यामुळे जिरायत भागातील आडगाव खडकेवाके पिंपळस पिंपरी निर्मळ यासह इतरही गावातील पाझर तलाव भरले गेले आहेत उर्वरित राहिलेल्या गावांच्या पाझर तलावातही पाणी सोडण्याची ग्वाही देवून, भविष्यातील पाणीटंचाईचे संकट काहीसे दूर होण्यास मदत होणार असल्याचे विखे पाटील म्हणाले.निळवंडेच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यासाठी लवकरच प्रयत्न केले जाणार असल्याचेही त्यांनी बैठकीत बोलताना सांगितले.तीन राज्यात भाजपाने मिळविलेल्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री अमित शहा राष्ट्रीय अध्यक्ष खा.जे.पी नड्डा यांच्या अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला.
यावेळी मंत्री विखे पाटील यांनी सांगितले यावेळी शेतकरी बांधवांमधून आलेल्या सूचना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ऐकून घेतल्या व त्या सूचनांचे निरसन केले याप्रसंगी मोहनराव सदाफळ ॲड रघुनाथ बोठे सावळीविहीरचे माजी सरपंच बाळासाहेब जपे संगमनेर तालुक्यातील शरद गोर्डे संरपंच श्रीमती पवार यांनी मनोगत व्यक्त केले तर गोदावरी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता उपलब्ध पाणीसाठा व आवर्तना संदर्भात माहिती दिली प्राध्यापक राजेंद्र निकाळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले
निळवंडे कालव्यांचे व्दारे जिरायत भागातील पाझर तलाव भरून दिल्याबद्दल आडगाव पिंपळस पिंपरीनिर्मळ यासह खडकेवाके गावच्या वतीने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा पुष्पहार घालून
माजी सरपंच सचिन मुरादे तसेच ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी व नागरिकांनी सत्कार केला. स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याकरिता एमआयडीसी करिता पाचशे एकर जमीन व निमगाव कोराळे गावात जिल्हाधिकारी कार्यालयासह इतर शासकीय कार्यालया करीता 22 एकर जमीन उपलब्ध करून दिल्याबद्दल निमगाव कोराळीचे सरपंच कैलास कातोरे व ग्रामस्थांनी महसूल मंत्री विखे पाटील यांचा सत्कार केला खंडकरी शेतकऱ्यांचा तसेच वर्ग दोन च्या जमिनी संदर्भात मंत्रिमंडळाचा आदेश काढून घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल निमगाव सावळविहीर यासह इतर गावातील खंडकरी शेतकऱ्यांच्या वतीने माजी सरपंच बाळासाहेब जपे व अन्य शेतकरी बांधवांनी सुद्धा मंत्री विखे पाटील यांचा सत्कार केला नामदार विखे पाटील यांनी महसूल मंत्री पद घेतल्यानंतर मतदार संघात विकासाची मोठी घोडदौड सुरू आहे नवनवीन विविध प्रकल्प येत आहेत त्यामुळे प्रत्येक कार्यक्रमात सत्कारासाठी गाव गावचे नागरिकांनी मंत्री विखे पाटील यांचा सत्कार करण्यासाठी मोठी गर्दी केली नियोजन.