लोणी दि.४( जनता आवाज वृत्तसेवा ):- लोकनेते पद्मभूषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी येथील सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत असणाऱ्या प्रा.मनीषा संदीप खर्डे यांना भगवंत विद्यापीठ, अजमेर येथून इंग्रजी या विषयात पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.
प्रा.मनीषा खर्डे यांनी “ ए स्टडी ऑन पेसीमिस्टिक एलिमेंट इन द थॉमस हार्डीज नोव्हेल्स ” या इंग्रजी विषयावर शोधनिबंध सादर केला होता. विद्यापीठाच्या समितीने सदर शोधनिबंध मान्य करत प्रा.मनीषा खर्डे यांना पीएचडी पदवी प्रदान केली.
इंग्रजी विभागातील डॉ. सुरेश कुमार यांचे त्यांना प्रमुख मार्गदर्शक म्हणून विशेष योगदान लाभले. प्रा.मनीषा खर्डे राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील उद्योजक संदीप खर्डे यांच्या पत्नी आहे.
कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी येथे शैक्षणिक कार्यक्रमांसोबतच विद्यार्थ्यांचा कमवा आणि शिका योजना,व्यक्तिमत्त्व विकास, उपक्रम देखील महाविद्यालयात राबवतात.डाॅ.खर्डे यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व महसुल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, खा.डॉ.सुजय विखे पाटील, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ, सहसचिव श्री.भारत घोगरे, शिक्षण संचालक डॉ.प्रदीप दिघे, कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयाच्या संचालिका डॉ.शुभांगी साळोखे, प्राचार्य डॉ.विशाल केदारी, डॉ.अनिल बेंद्रे तसेच इतर शिक्षक वृंदानी अभिनंदन केले.