लोणी दि.५( जनता आवाज वृत्तसेवा ):- उदगीर येथे झालेल्या राज्यस्तरीय १७ वर्ष वयोगट मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत एकूण ०८ विभागातुन पुणे विभाग ( प्रवरा कन्या विद्या मंदिर) , नागपूर, अमरावती, नाशिक, मुंबई, लातूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजी नगर असे संघ सहभागी झाले होते. यामध्ये प्रवरा कन्या विद्या मंदिर चा संघाने नागपूर बरोबर ३-० ने आघाडी घेतली. अमरावती बरोबर ४-० ने जिंकून कोल्हापूर बरोबर अंतिम सामना झाला. या सामन्यात प्रवरा कन्या विद्यामंदिरच्या संघाने पुणे विभागाचे नेतृत्व करुन कोल्हापूर संघावर ३-१ ने आघाडी घेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला.
संघाला क्रीडा शिक्षिका सौ.विद्या घोरपडे ,हॉकी कोच सौ कल्पना कडू यांचे मार्गदर्शन मिळाले. या सर्व सहभागी खेळाडूंचे व मार्गदर्शकांचे घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ सुजय विखे पाटील, संस्थेचे सहसचिव भारत घोगरे , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालक डाॅ.प्रदिप दिघे, संचालिका सौ एल बी सरोदे , समन्वयक प्रा. नंदकुमार दळे , क्रिडा संचालक डाॅ.प्रविण विखे, प्रवरा कन्या मंदिरच्या प्राचार्या सौ भारती कूमकर ,सौ सीमा बढे , पर्यवेक्षक बी पी चिंधे , ज्येष्ठ शिक्षक अनिल लोखंडे , सौ मोहिनी गायके , आर. एम. लबडे, सुरेश गोडगे यांनी अभिनंदन केले.