दाढ (जनता आवाज वृत्तसेवा ):-विकसीत भारत संकल्प यात्रेचे राहाता तालुक्यातील दाढ बुद्रुक येथे ग्रामस्थांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले. याप्रसंगी उद्योजक श्री. सुनील भारत पाटील तांबे, कारखान्याचे माजी संचालक श्री.अशोक राजाराम गाडेकर, श्री. प्रल्हाद रंगनाथ तांबे, माजी सभापती श्री. सुभाषराव गाडेकर, श्री. सूरेश काका तांबे, श्री. भास्करराव तांबे, श्री. पांडुरंग कुमकर, श्री. लहानु दिघे, सोसायटीचे चेअरमन सुदाम गाडेकर, व्हा. चेअरमन सोमनाथ गाडेकर, ग्रामविकास अधिकारी संजय गिऱ्हे, महात्मा फुले विद्यालयाचे प्राचार्य डॉ.कोबरणे सर शिक्षक वृंद व विद्यार्थी, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापीक श्रीमती. पाळंदे मॅडम, अध्यापक श्री. अनाप सर, पोस्ट मास्तर श्रीमती जोशना लोहकरे, कृषी सहाय्यक श्री, प्रशांत वाकचौरे, कार्यक्रमाचे निरीक्षक श्री. कोळेकर के.एम. हे उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने शंभरहून अधिक योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. या योजनांमध्ये सातत्य राखले गेल्यामुळेच योजनांचा लाभ सर्व लाभार्थ्यांना मिळत आहे. नऊ वर्षांच्या कार्यकाळाचे हे मोठे यश असून, या योजनांमधून जे लाभार्थी वंचित राहीले आहे त्यांच्यासाठी या यात्रेच्या माध्यमातून पुन्हा एकदा योजनांची माहीती गावपातळीवर सहजपणे मिळू शकेल.
यावेळी विकसीत भारत संकल्प यात्रेचे स्वागत महात्मा फुले विद्यालय दाढ बुद्रुक च्या लेझिम व ढोल पथकाने केले. गावातून या रथाची मिरवणूक काढून नागरिकांनी स्वागत केले.
यावेळी शासनाच्या विविध योजनांची माहिती कृषी विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, महसूल विभाग, बचत गट, विविध कार्यकारी सोसायटी, टपाल विभाग तसेच इतर अनेक विभागांच्या वतीने शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.
यावेळी शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना देण्यासाठी वेगवेगळ्या विभागांच्या वतीने स्टॉल लावण्यात आले होते. या माध्यमातून योजनांची माहीती उपस्थितांना दिली गेली. आरोग्य विभागाच्या वतीने आयुष्यमान भारत कार्डचे वितरणही यावेळी करण्यात आले.
विकसीत भारताची शपथही यावेळी उपस्थितांना देण्यात आली. शासनाच्या विवध योजनांचा लाभ घेतलेल्या नागरिकांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. ग्रामविकास आधिकारी संजय गिऱ्हे यांनी यात्रेबाबतची माहीती उपस्थितांना दिली.
सरपंच तात्यासाहेब सातपुते यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी सुरू केलेल्या विवध योजनाचा लाभ सर्व ग्रामस्थांनी घ्यावा असे आवाहन केले. तसेच उपसरपंच नकुल तांबे यांनी मनोगत व्यक्त करून सन्मा. नामदार राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या मा. अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील व खासदार डॉ सुजय दादा विखे पाटील यांच्या माध्यमातून सर्व ग्रामस्थांनी विवध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायत दाढ बुद्रुक कटिबध्द असल्याचे नमूद केले व उपस्थितांचे आभार मानले.