लोणी दि.२५( जनता आवाज
वृत्तसेवा ):-लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय लोणी येथील माजी विद्यार्थी कु.युवराज इंगळे आणि कु.कुणाल अलदार यांची आय.आय.टी.येथे पदव्युत्तर शिक्षणासाठी निवड झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विशाल केदारी यांनी दिली.
अभियांत्रिकीमधील पदवीधर अभियोग्यता चाचणी (GATE) ही एक राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा आहे जी प्रामुख्याने अभियांत्रिकी / तंत्रज्ञान / आर्किटेक्चर / विज्ञान / वाणिज्य / कला मधील विविध पदवीपूर्व विषयांच्या सर्वसमावेशक आकलनाची चाचणी घेत असते. गेट २०२३ ही भारतीय तंत्रज्ञान संस्था कानपूरद्वारे घेतली जात आहे, ही परीक्षा आय.आय.एस.सी बंगलोर आणि सात आय.आय.टी (आयआयटी मुंबई, आयआयटी दिल्ली, आयआयटी गुवाहाटी, आयआयटी कानपूर, आयआयटी खरगपूर, आयआयटी मद्रास, आयआयटी रुरकी) राष्ट्रीय समन्वय मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येते.
सदर परीक्षेमध्ये कुणाल अलदार यांनी सपूर्ण भारतामधून ५६२ क्रमांक तसेच युवराज इंगळे यांनी २९५३ वा क्रमांक मिळविला तसेच पुढील शिक्षणासाठी कुणाल यांची आय.आय.टी गुवाहाटी येथे मास्टर इन टेक्नॉलॉजी ऑफ बायोमेडीकल इंजिनिअरिंग व युवराज यांची आय.आय.टी खरगपूर येथे मास्टर इन टेक्नॉलॉजी ऑफ बायोटेक्नॉलॉजी या विषयात शिक्षण घेण्यासाठी निवड झाली आहे.
सदर विद्यार्थ्यांना कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयाच्या संचालिका डॉ.शुभांगी साळोखे, प्राचार्य डॉ.विशाल केदारी, प्रा.प्रविण गायकर,प्रा.भाऊसाहेब घोरपडे, प्रा.महेश चंद्रे,
डॉ.अमोल सावंत, डॉ.स्वप्निल नलगे, प्रा.स्वरांजली गाढे तसेच इतर शिक्षकवृंदाचे मार्गदर्शन लाभले.
सदर विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, कार्यकारी अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे,अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डाॅ.शिवानंद हिरेमठ, कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयाच्या संचालिका डॉ.शुभांगी साळोखे, प्राचार्य डॉ.विशाल केदारी यांनी अभिनंदन केले.