23.9 C
New York
Thursday, June 26, 2025

Buy now

spot_img
spot_img

मंत्री विखे पाटील यांनी घेतली कोपरगावच्या गौरी पगारेच्या शिक्षणाची जबाबदारी! सारेगमप मध्ये मिळविले यश !

शिर्डी दि.६( जनता आवाज वृत्तसेवा ):-झी वृतवाहीनी वरील सारेगमप लिटील चॅम्प्स या कार्यक्रमात महाविजेती ठरलेल्या गौरी अलका पगारे या गायिकेस प्रवरा उद्योग समूहाच्या शैक्षणिक संकुलात सर्व शैक्षणिक संधी आणि सुविधा उपलब्ध करुन देण्याची हमी महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

कोपरगाव शहरातील नागरीकांच्या वतीने महाविजेत्या ठरलेल्या गौरी पगारे हिचा नागरी सत्कार महसूल मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात याप्रसंगी आ.आशुतोष काळे माजी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे महानंदाचे चेअरमन राजेश परजणे पतसंस्था फेडरेशनचे काका कोयटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

मंत्री विखे पाटील यांनी गौरी पगारे आणि तिच्या मातोश्री अलका पगारे यांचे अभिनंदन करून वैयक्तिक संवाद साधला आणि पुढे काय करयाचे ठरवले आहे आशी विचारणा केली.तुला आमच्या संस्थेत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली तर येण्याची तयारी आहे का या विखे पाटील यांच्या प्रश्नाला गौरी हिने सकारात्मक प्रतिसाद देवून लगेच होकारही दिला.

अतिशय सामान्य परीस्थीती असताना गौरी पगारे हिने गाण्याची आवड जोपासून सारेगमप लिटील चॅम्प्स या स्पर्धेत महाविजेती होण्यचा मिळविलेला मान केवळ कोपरगावचा नाहीतर नगर जिल्ह्याच्या दृष्टीने गौरवाची बाब असल्याचे विखे पाटील म्हणाले.

गौरीला पुढील सर्व शैक्षणिक सुविधा प्रवरा उद्योग समूहात उपलब्ध करून देण्याची ग्वाही मंत्री विखे पाटील यांनी देतानाच गौरीला जेव्हा वाटेल तेव्हा तिने प्रवेशा करीता संपर्क करण्याचे त्यांनी सूचित केले.

यापुर्वी संभाजीनगरचा पालक मंत्री असताना सारेगमपच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या एका गायिकेला अपघात झाला होता.त्यावेळी एअर ॲम्बुलन्सची  उपलब्धता करून तिला पुढील उपचारांकरीता मुंबईला हलवले होते रुग्णालयाचे बीलही विनंती करून माफ केले होते याची आठवण विखे पाटील यांनी या संवादात आवर्जून सांगितली.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!