श्रीरामपूर( जनता आवाज
वृत्तसेवा ):-श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूरचे सरपंच महेंद्र साळवी यांनी गावकरी मंडळाला सोडचिठ्ठी देऊन जनता विकास आघाडीत प्रवेश करून जल्लोषाचा गुलाल खाली बसतो ना बसतो तोच साळवी यांनी शनिवारी सकाळी जनता विकास आघाडीला राम राम करून पुन्हा गावकरी मंडळात प्रवेश केल्याने बेलापुरात राजकीय नाट्याचा अंक नागरिकांना बघायला मिळाला.
गावकरी मंडळाचे सरपंच साळवी यांनी सोमवारी जनता विकास आघाडीत प्रवेश करून धक्का दिला होता.तो गुलाल खाली येण्यापूर्वीच सरपंच साळवी यांनी सकाळीच पुन्हा जनता विकास आघाडीला जोरका धक्का देत पुनः गावकरी मंडळात प्रवेश केल्याने बेलापुरात राजकीय नाट्याची चांगलीच चर्चा रंगली.यावेळी गावकरी मंडळाचे नेते शरद नवले,उपसरपंच अभिषेक खंडागळे,जालिंदर कुऱ्हे,भाऊसाहेब कुताळ,सुधाकर खंडागळे,इस्माईलभाई सय्यद,पुरुषोत्तम भराटे,प्रफुल्ल डावरे,चंद्रकांत नवले, रमेश अमोलिक,वैभव कुऱ्हे,सविता अमोलिक,प्रियंका कुऱ्हे, मुश्ताक शेख,मीना साळवी,तब्बसूम बागवान आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. दरम्यान अविश्वास ठराव दाखल करणे व सह्यांचे अधिकार अबाधित ठेवणे.
यासाठी दोन्हीही गटाकडून ग्रामपंचायत सदस्यांना वेगवेगळी अमिषे दाखवले जात होते.मात्र कोणत्याही सदस्यांची फाटाफूट झाली नाही.सरपंच साळवी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु संपर्क होऊ शकला नाही.याबाबत गावकरी मंडळाच्या नेत्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले,जनता विकास आघाडीच्या नेत्यांनी साळवी यांना फसवून तिकडे नेले होते.मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच साळवी पुन्हा गावकरी मंडळात स्वगृही आले.तर दुसरीकडे साळवी यांच्यावर चौकशीचा दबाव आणण्यात आल्याने त्यांचा नाईलाज झाल्याचे जनता विकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितले.
बेलापूर गावासाठी १२६ कोटीची पाणी योजना तसेच शेती महामंडळाची त्यासाठी मोफत जागा उपलब्ध महसूल मंत्री विखे पा. यांनी करून दिली होती. मात्र यानंतर गावात खालच्या पातळीचे राजकारण झाले.