spot_img
spot_img

प्रवरेच्या गृह विज्ञान विभागाची कु.जयश्री मेंढे ही ची पुणे विद्यापीठाच्या फुटबॅाल संघात निवड

लोणी दि.७( जनता आवाज वृत्तसेवा ):-लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील गृह विज्ञान आणि संगणक महिला महाविद्यालयाच्या गृह विज्ञान विभागाच्या प्रथम वर्षाची कु. जयश्री काकासाहेब मेंढे हिची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या फुटबॉल संघात निवड झाली आहे. हा संघ आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी आयटीएम विद्यापीठ, ग्वालियर येथे रवाना होणार आहे अशी माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनुश्री खैरे यांनी दिली. 

महाविद्यालयाच्या माध्यमातून शिक्षणासोबत क्रिडा क्षेञाला प्राधान्य दिले जाते.कु.जयश्री मेंढे हिला क्रिडा संचालक डॉ. उत्तम अनाप यांचे मार्गदर्शन लाभले.

यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ सुजय विखे पाटील, संस्थेचे सहसचिव भारत घोगरे , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालक डाॅ.प्रदिप दिघे, संचालिका सौ एल बी सरोदे , समन्वयक प्रा. नंदकुमार दळे , क्रिडा संचालक डाॅ.प्रविण विखे यांनी अभिनंदन केले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!