नेवासा फाटा( जनता आवाज
वृत्तसेवा ):-नेवासा तालुक्यातील माळीचिंचोरे येथे पंचायत समितीच्या माजी सभापती सुनिताताई गडाख यांच्या शुभहस्ते आ शंकरराव गडाख यांच्या विशेष प्रयत्नातुन मंजूर विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण संपन्न झाले.
आमदार शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नातून एकूण 62.50 लक्ष रुपयांचा विकास निधी फक्त माळीचिंचोरे या गावासाठी मंजूर केल्यामुळे गावातील जनतेने आमदार शंकरराव गडाख यांचे आभार मानले.गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबीत विकास कामे आ गडाख यांच्या प्रयत्नातून माळीचिंचोरे गावात मार्गी लागले आहेत माळीचिंचोरे गावात विविध विकास कामे मंजूर करून मार्गी लावल्याने गावाचा सर्वांगीण विकास होण्यास मोठी मदत होणार आहे.
सर्वात मोठा गावचा दळणवळणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता मात्र आमदार शंकरराव गडाख यांनी शासना कडे सातत्याने पाठपुरावा करून माळीचिंचोरा ते कारेगाव हा रस्ता रुपये ३० लक्ष खर्च करून मजबुतीकरण व डांबरीकरण करून मार्गी लावल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच लाखेफळ येथे रुपये 19 लक्ष खर्च करून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दोन वर्ग खोल्यांचे बांधकाम पूर्ण केले. तसेच लाखेफळ येथील पांढरी वस्ती येथे 8.5 लक्ष रुपयाची अंगणवाडी इमारत बांधण्यात आली, तुकाराम महाराज मंदिर परिसरात ५ लक्ष रुपयांची संरक्षण भिंत बांधण्यात आली. ही सर्व विकास कामे आमदार शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नांमुळे पूर्ण झाली आहेत.
सुनिताताई गडाख यांनी आपल्या भाषणात म्हटले की संबंधित अधिकाऱ्यांनी व प्रत्येक गावातील गावकऱ्यांनी एकत्रितपणे बसून विकास आराखडा तयार करावा ही कामे मंजूर करण्यासाठी आ गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पाठपुरवा करू त्यामुळे आता नेवासा तालुक्यातील विकास हा आमदार शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने असाच होत राहील असेही शेवटी सुनीताताई गडाख यांनी म्हटले.
या विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी माळीचिंचोरा परिसरातील ग्रामस्थ सरपंच,उपसरपंच, चेअरमन ,व्हा चेअरमन व सर्व संचालक मंडळ विविध संस्थाचे पदाधिकारी ,ग्रामस्थ मोठ्या
संख्येने उपस्थित होते.