24.9 C
New York
Thursday, August 28, 2025

Buy now

spot_img
spot_img

गोवंश रक्षकांवर जमावाचा गोळीबार; ममदापुर येथील घटना,हल्ल्यात तलवारी-कोयत्याचा वापर

लोणी ( जनता आवाज वृत्तसेवा ):-लोणीच्या बाजारातून ममदापूर येथे कत्तलीसाठी जनावरे आल्याची माहिती मिळाल्याने ते ठिकाण दाखवायला गेलेल्यांवर जमावाने तलवारी व कोयत्याने हल्ला चढवल्याची खळबळजनक घटना ममदापुरात घडली. यावेळी एका आरोपीने बंदुकीतून गोळीबारही केला.याप्रकरणी लोणी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस ठाण्यात आप्पासाहेब बाबासाहेब नाईकवाडे, वय-३९, धंदा-शेती, रा. तांदुळनेर, ता. राहुरी यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, आपण प्राणी कल्याण समिती या संस्थेत काम करतो. काल दि.६ डिसेंबरला दुपारी १२ ला लोणीच्या बाजारातून काही कसाई लोकांनी जनावरं खरेदी करून ते ममदापूर येथे नेवून कत्तल करणार असल्याची माहिती आपल्याला कळाल्याने आपण पोलिस उपअधीक्षक संदिप मिटके यांना याबाबत माहिती दिली.

त्यांनी पोलीस हवालदार इरफान शेख, अशोक शिंदे, शाम जाधव यांचे पथक पाठवले व सदर कत्तलीचे ठिकाण दाखवण्यासाठी गोरक्षक दलाचे इश्वर ज्ञानदेव टिळेकर, साईराज सोपान बेंद्रे असे आम्ही खासगी वाहनाने ६ वा. ममदापूर गावात गेलो. त्याठिकाणी काही लोकांनी गोवंश जनावरे कत्तलीसाठी बांधून ठेवल्याचे दिसले.तर बाजूला हौदात मांसांचे तुकडे, हाडे पडलेली दिसली व दोन गोवंश जनावरांची कत्तल केलेली दिसली.

आम्ही सदर जनावरे तेथून सोडत असताना तेथे जमलेल्या दहा ते बारा लोकांनी अचानकपणे आमच्यावर हल्ला केला. त्यांच्या हातातील कोयते, तलवारी, काठ्या घेवून ते आमच्या अंगावर धावले व मारहाण करायला सुरूवात केली. यावेळी माझ्या सोबत असणाऱ्या साईराज बेंद्रे यास मियाज कुरेशी याने ‘तुझे आज छोडूंगा नही, तुझे खत्म कर दूंगा, मार डालो इसको’, असे म्हणून त्याच्या डोक्यात हत्याराने मारून दुखापत केली.याठिकाणी जमाव उग्र झाल्याने आमच्याबरोबर असलेल्या पोलिसांनी आम्हाला तेथून बाहेर काढले. आम्ही तेथून जात असताना या लोकांपैकी एकाने माझ्या दिशेने बंदुकीतून गोळीबार केला. त्यामुळे आम्ही आजुबाजूच्या शेतात लपून बसलो. सदर लोकांनी आमची खासगी वाहने, मोटारसायकल तोडून, फोडून त्यांचे नुकसान केले.

तसेच या घटनेत आपले पाकीट व इश्वर टिळेकर याची चैन, हातातील ब्रासलेट कोठेतरी पडले. त्यानंतर पोलिसांनी शेतात येवून आम्हाला त्या ठिकाणाहून बाहेर काढल्याचे नाईकवाडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. नाईकवाडे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मियाज कुरेशी, सद्दाम कुरेशी, अरबाज कुरेशी, नजीम कुरेशी, साजीद कुरेशी, वसीम कुरेशी, समीर कुरेशी, अजीम शहा, शाकीर शहा, जतीक कुरेशी, मुनीर कुरेशी, इम्रान अब्दुल हक शेख, अन्सार इब्राहीम शेख, नाजीन फकीर महंमद शेख, मुदतसर यासीन शेख, हुसेन फकीर महंमद शेख, सर्व रा. ममदापूर, ता. राहाता यांच्याविरूद्ध भादंवि कलम ३०७, ३२३, ३२४, ४२७, ५०६, १४३, १४७, १४८, १४९,  आर्म ॲक्ट  १९५९ चे कलम ४, २५, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१), १३५ प्रमाणे लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी पोलीस करीत आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!