शेवगाव( जनता आवाज वृत्तसेवा ):-नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विविध विकासकामे सातत्याने सुरूच आहेत. आज देखील घोटण गावामध्ये जेव्हा खासदार डॉ. सुजय विखे आले, ते दहा कोटी रुपयांचा निधी घेऊनच.. त्यामुळे नागरिकांना भेडसावणारे विविध प्रश्न सुटणार असल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यावेळी खासदार सुजय विखे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी स्पष्ट केले की, मागील दीड वर्षाच्या कालखंडामध्ये जेव्हा आपले सरकार आले तेव्हा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व अजितदादा पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव तालुक्यामध्ये आमदार मोनिकाताई राजळे यांच्या नेतृत्वात किमान शंभर कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे.
तसेच खासदार विखे म्हणाले, साखर वाटण्याच्या मागील उद्देश एकच आहे आणि तो म्हणजे आपण दरवर्षी दिवाळी साजरा करत असतो, प्रत्येकाच्या घरी, गावी आणि पूर्ण देशात दिवाळी साजरी केली जाते. जेव्हा प्रभू श्रीराम १४ वर्षांचा वनवास संपवून अयोध्या नागरीमध्ये परतले त्या वेळेस तिथे दिवे लावून दिवाळी साजरी करण्यात आली. त्यामुळे यावर्षी आपण दोन वेळा दिवाळी साजरा करत आहोत.
पहिली दिवाळी विधिवत साजरा झाली आणि दुसरी दिवाळी ही येणाऱ्या २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये अयोध्या येथे संपन्न होणाऱ्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने साजरी केली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर प्रत्येक गावातील कुटुंबांना पाच किलो साखर चणाडाळ वाटप करण्यात येत आहे. असे सांगून “आम्ही दिलेली साखर काही लोकांना कडू लागेल” असा उपरोधिक टोला देखील विखे पाटील यांनी यावेळी बोलताना विरोधकांना लगावला.
आज घोटन येथे विविध विकासकामांचा लोकार्पण व भूमिपूजन समारंभ संपन्न झाला याप्रसंगी ते बोलत होते. या कामांमध्ये १ टि-०४ एसएच-५० +(राक्षी) एमडीआर-४० एसएच-६१ गोटन ते दहिफळ जुना रस्ता किमी ०/००ते ५/८००, ८/२५० ते १०/८००, जिल्हा वार्षिक नियोजन दलित वस्ती योजने अंतर्गत एरंडगाव रोड दलित वस्ती काँक्रीट रस्त्याचे लोकार्पण-१५ लक्ष, अर्थसंकल्पीय २०२२-२३ पीडब्ल्यूडी अहमदनगर घोटण ते टाकळकर वस्ती रस्ताज ड्रामा ६३ कि.मी ०/०० ते १/०० मध्ये रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्याचे भूमिपूजन- लक्ष ३०, कालिका मंदिरासमोर पेव्हींग ब्लॉक बसवण्याच्या कामाचे भूमिपूजन- १० लक्ष, जिल्हा वार्षिक नियोजन दलित वस्ती अंतर्गत मराठी शाळेमागे दलित वस्ती येथे स्ट्रीट लाईटचे लोकार्पण-५ लक्ष तसेच चापडगाव येथे प्रधानमंत्री ग्रामसडक योजना टप्पा क्र. ३ २०२२-२३ मधील प्र.जि.मा. ४० (दहिगाव शे), चापडगाव ते अंतरवली बु. रस्त्याचे भूमिपूजन करणे – ३२२.६२ लक्ष, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मौजे चापडगाव ते मंगळूर बु. वाडगाव रस्ता १० किमी डांबरीकरण करण्याच्या कामाचे भूमिपूजन – ८ कोटी ४० लक्ष, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत नवीन वर्गखोल्या लोकार्पण – १२ लक्ष, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत दलित वस्ती गावठाण काँक्रिटीकरण लोकार्पण – २५ लक्ष, नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत डिजिटल क्लासरूम – २.६० लक्ष आदी कामांचा लोकार्पण तथा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशात सुरू झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ देखील आज शेवगाव तालुक्यातील घोटण येथून खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमदार मोनिका राजळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्ताने उपस्थित सर्व लाभार्थ्यांची संवाद साधून विकासाची सविस्तर माहिती देखील खासदार सुजय विखेंनी दिली. याप्रसंगी अरुण मुंडे, लक्ष्मण टाकळकर, संजूभाऊ टाकळकर, प्रकाश घुगे, गणेश निकम, अमोल सागडे, घुगे ताई आदींची उपस्थिती होती.