2.5 C
New York
Saturday, November 23, 2024

Buy now

spot_img
spot_img

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सुरू झालेल्या केंद्र सरकारच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत प्रामाणिकपणे पोहोचवल्या: खा. सुजय विखे पाटील

पाथर्डी ( जनता आवाज वृत्तसेवा ):-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या केंद्र सरकारच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले असल्याचे मत खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले.

कोरडगाव ता. पाथर्डी येथे शासन आपल्या दारी योजने अंतर्गत पाथर्डी तहसील कार्यालय व पंचायत समिती यांच्या वतीने विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्र वाटप व विविध विकासकामांच्या भूमिपूजन समारंभाप्रसंगी ते बोलत होते. सदरील भूमिपूजन समारंभ खा. डॉ. सुजयदादा विखे पाटील व आमदार मोनिकाताई राजळे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी त्यांनी उपस्थित समस्त नागरिकांशी संवाद साधला.

गोरगरीब जनतेला टक्केवारी न घेता सर्व महसूल विभागाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या तसेच जिल्हा परिषदेच्या मार्फत प्रत्येक गावाला दहा लाख रुपयांचा निधी दिला. यावेळी कोणाला टक्केवारी न देता गावातील कामे सुरू झाली. तसेच कोरोना नंतर अवघ्या एक वर्षांमध्ये नॅशनल हायवे ६१ देखील पूर्ण केला, ही आहे खासदाराची उपलब्धता असे देखील खासदार विखेंनी स्पष्ट केले.

तसेच नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जी काही विकासकामे सध्या चालू आहेत या विकासकामांसाठी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करावा लागतो. दीड वर्षाच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून शेगाव पाथर्डी मतदारसंघांमध्ये आमदार मोनिकाताई यांच्या माध्यमातून शंभर कोटी पेक्षा जास्त निधी आणला असेही त्यांनी बोलताना मांडले.

याआधी सुद्धा नगर जिल्ह्यात महसूल मंत्री पद होतं, पण पुढच्या गरीबाला अशा पद्धतीच्या योजनेचा लाभ त्यांना देता आला नाही असा टोला खासदार विखेंनी विरोधकांना लगावत नेतृत्वात बदल झाला की सर्वसामान्य नागरिकांपर्यंत योजना पोहोचतात असे मत मांडले. यासोबतच विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांसाठी जे हिताची निर्णय घेतले त्याबद्दल देखील त्यांनी यावेळी भाष्य केले.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष राहुल राजळे, अभय आव्हाड, दिलीप भालसिंग, तालुकाध्यक्ष माणिकराव खेडकर, महिला तालुकाध्यक्ष काशीबाई गोल्हार, विष्णुपंत अकोलकर, अजय रक्ताटे, मधुकर देशमुख, नारायण काकडे, बाबासाहेब किलबिले, दामू काकडे, साखरबाई म्हस्के, बाळासाहेब देशमुख तसेच अधिकारी, ग्रामस्थ आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!