3.1 C
New York
Saturday, November 23, 2024

Buy now

spot_img
spot_img

सोमवारी खा. सुजय विखे पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न होणार एम.आर.आय. सेंटरचे लोकार्पण..

नगर (जनता आवाज वृत्तसेवा ):-अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर व लोकमान्य हॉस्पिटल मेडिकल स्टोअर्स यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार ११ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता सावित्रीबाई फुले व्यापारी संकुल, आकाशवाणी केंद्राशेजारी, सावेडी, अहमदनगर येथे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या शुभहस्ते एम.आर.आय. सेंटरचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. 

सदरील सोहळा महापौर रोहिणी शेंडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि आमदार संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार

सदरील एम.आर.आय. मशीन प्रकल्प हा नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील पहिलाच प्रकल्प असणार आहे. जिल्हा नियोजन समितीमार्फत मार्च २०१९ मध्ये या योजनेच्या अंतर्गत महानगरपालिकेस ३ कोटी ५ लक्ष रुपयांचा निधी सदरील सेंटर विकसित करण्यासाठी प्राप्त झाला होता. निधी प्राप्त झाल्यानंतर निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आणि लोकमान्य मेडिकल स्टोअर्स, पुणे या संस्थेला टर्न की प्रोजेक्टद्वारे हे काम सोपविण्यात आले होते. तसेच या एम.आर.आय. सेंटरचे दर इतर खाजगी सेंटरच्या तुलनेत कमी करणेबाबत मा. स्थायी समितीने मंजुरी दिल्यानुसार ठरविण्यात आले आहेत असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

तसेच हे सेंटर चालवण्याची जबाबदारी लोकमान्य मेडिकल स्टोअर, पुणे या संस्थेला देण्यात आली आहे. अहमदनगर महापालिकेने मा. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून शहरातील व जिल्ह्यातील गोरगरीब व गरजू रुग्णांसाठी ना नफा ना तोटा या तत्त्वावर सुरू केलेली ही एम.आर.आय. सुविधा निश्चितच अनेक नागरिकांसाठी फायदेशीर ठरणार असल्याचे त्यांनी संगितले. कारण रुग्णांकडून यासाठी न्यूनतम दर आकारले जाणार आहेत.

याशिवाय भविष्यात शासनाकडून विविध योजनेअंतर्गत उदा. महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजना इ. मध्ये या सेवेचा समावेश झाल्यास त्या लाभार्थ्यांना सदरील सुविधा मोफत देखील उपलब्ध होणार आहे. त्यामुळे गोरगरीब नागरिकांच्या दृष्टीने ही सेवा अतिशय हितकारक अशी ठरणार आहे अशी माहिती खासदार सुजय विखे पाटील यांनी दिली.

याप्रसंगीआमदार प्रा. राम  शिंदे, आमदार किशोर दराडे, आमदार सत्यजित तांबे, भाजपा शहराध्यक्ष अभय आगरकर, शिवसेना जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, आयुक्त डॉ. पंकज जावळे, उपमहापौर गणेश भोसले, स्थायी समितीचे सदस्य उमेश कवडे, सभागृह नेता विनीत पाऊलबुद्धे, महिला व बालकल्याण समितीचे सभापती पुष्पा बोरुडे, महिला व बालकल्याण समितीची उपसभापती मीना चोपडा, विरोधी पक्ष नेता संपत बारस्कर, अनिल बोरगे, अजित निकत,सचिन बांगर, श्रीनिवास कुरे, डॉ. प्रदीप पठारे तसेच माजी नगरसेवक माजी नगरसेविका अहमदनगर महानगरपालिकेचे सर्व अधिकारी व सर्व कर्मचारी वृंद उपस्थित राहणार आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!