लोणी दि.१०( जनता आवाज वृत्तसेवा ):–पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदावर सुनिल तांबे आणि किरण सुधाकर दिघे यांची निवड झाली असून,कामगार संचालक म्हणून नंदकुमार गव्हाणे,अल्ताफ पापा पटेल यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
कारखान्याच्या संचालक मंडळातील या दोन संचालक अनुक्रमे उतमराव दिघे आणि देवीचंद तांबे यांचे निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागांवर संचालक नियुक्त करण्यासाठी सहकारी संस्थाचे जिल्हा उपनिबंधक मिंलींद भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या गट नंबर दोन मधून बैठकीत दाढ येथील सुनिल भारत तांबे आणि गट नंबर तीन मधून किरण सुधाकर दिघे यांची एकमताने निवड करण्यात आली.तसेच कामगार संचालक म्हणून नंदकुमार गव्हाणे आणि अल्ताफ पापा पटेल यांच्या नावावर एकमाने शिक्कामोर्तब करण्यात आले.नवनिर्वाचित संचालकांचे चेअरमन कैलास तांबे आणि व्हा चेअरमन सतिष ससाणे यांनी अभिनंदन केले.
याप्रसंगी संचालक संजय आहेर रामभाऊ भुसाळ डॉ दिनकर गायकवाड सुभाष अंत्रे स्वप्निल निबे दादासाहेब घोगरे साहेबराव म्हस्के दतात्रय खर्डे धनंजय दळे बाबू पडघलमल संपत चितळकर आण्णासाहेब म्हस्के पाटील महीला संचालिका संगिता खर्डे उज्वला घोलप कार्यकारी संचालक अमोल पाटील बोर्ड सेक्रेटरी शिवाजी जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.सभेचे अध्यक्ष मिलींद भालेराव यांच्यासह नूतन संचालकाचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला.
नवनिर्वाचित संचालकांचे महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील खा.डॉ सुजय विखे पाटील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालीनी विखे प्रवरा बँकेचे चेअरमन डॉ भास्करराव खर्डे ट्रक वाहतूक सोसायटीचे अध्यक्ष नंदूशेठ राठी यांनी अभिनंदन केले आहे.




