26.1 C
New York
Sunday, August 24, 2025

Buy now

spot_img
spot_img

विखे पाटील पॉलिटेक्निकलच्या १७७ विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड – प्राचार्य डॉ.विजय राठी

लोणी दि.२३( जनता आवाज
 वृत्तसेवा ):-विखे पाटील पॉलिटेक्निकच्या १७७ विद्यार्थ्यांना बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये शिक्षण पुर्ण होण्यापुर्वीच नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. गेल्या वर्षभरात पॉलिटेक्निकच्या विविध अभ्यासक्रमातील शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड झाल्याची माहिती प्राचार्य डॉ. विजय राठी यांनी दिली.
 
 घरडा केमिकल्स लिमिटेड रत्नागिरी, बजाज ऑटो लिमिटेड, पुणे, आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया, हजीरा सुरत गुजरात, सिग्मा इलेक्ट्रिक कॉर्पोरेशन प्रा. लि., चाकण पुणे, टोयो इंजिनिअरिंग इंडिया प्रा. लि., मुंबई, टाटा मोटर्स लि., पुणे, फोर्ब्स मार्शल,चाकण पुणे, क्लासिक व्हील्स प्रायव्हेट लिमिटेड, अहमदनगर, तेलगे प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, पुणे, के रहिजा कन्स्ट्रक्शन पुणे, टॉरेसिड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड,गुजरात, सिप्ला फार्मास्युटिकल्स, कुरकुंभ, जेबील सर्किट इंडिया प्रा. लि., रांजणगाव, पॅरासन मशिनरी (इंडिया) प्रा. लि., छत्रपती संभाजीनगर, एमक्युअर फार्मास्युटिकल्स “कुरकुंभ, डेक्कन केमिकल्स गोवा, लक्ष्मी सिव्हिल इंजिनीअरिंग सर्व्हिसेस प्रा. लि., कोल्हापूर, एकोलेड इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे, एपिटोम कॉम्पोनंट्स लि, अहमदनगर, श्नाइडर इलेक्ट्रिक इंडिया प्रा. लि., मुंबई, एस. एम. के पॉलिमर अँण्ड परमहंस प्रा. लि., ठाणे, आरती ड्रग्स, बोईसर अशा अनेक विविध २७ कंपन्यांमधून विखे पाटील पॉलिटेक्निकच्या १७७विद्यार्थ्यांना नोकरीची संधी प्राप्त झाली आहे. तसेच काही विद्यार्थ्यांचे दोन-तीन कंपन्यांमधून देखील मुलाखतीदरम्यान निवड झाली आहे. यामुळे पालक व विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण दिसत आहे. अनेक कंपन्यांचे अधिकारी यांनी विद्यार्थ्यांच्या मुलाखती दरम्यान ग्रामीण भागातील या विखे पाटील पॉलिटेक्निकचे विद्यार्थी कुठेही कमी पडत असल्याचे सांगत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे कौतुक केले.
संस्थेचे अध्यक्ष व महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कल्पक नेतृत्वामुळे परिसर मुलाखतीसाठी बहुराष्ट्रीय कंपन्याचा मोठा प्रतिसाद मिळत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली माजी विदयार्थ्यांचाही मोठा सहभाग व प्रोत्साहन मिळत असल्याने विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्यासाठी यशस्वी प्रयत्न होत असल्याचे विखे पाटील पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. व्ही.आर. राठी यांनी सांगितले. मुलाखतीसाठी ट्रेनिगं प्लेसमेंट अधिकारी प्रा. राजेंद्र निंबाळकर, सर्व विभाग प्रमुख तसेच सर्व विभागातील ट्रेनिंग अँण्ड प्लेसमेंट समन्वयक यांनी परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता निर्माण होण्यासाठी इंडो जर्मन टूल रूम, छत्रपती संभाजीनगर यांच्या सहकार्याने उद्योजकता जागरूकता उपक्रम तसेच सीयुसक्सिड पुणे यांचे यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांसाठी सॉफ्ट स्किल आणि कम्युनिकेशन स्किल या विषयावर दोन आठवड्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. आर्डिनो प्रोग्रामिंग, सेन्सर्स इंटरफेसींग या तंत्राच्या उपयोगाबाबत अँब्स सी-डीएसपी छत्रपती संभाजीनगर या संस्थेतर्फे विद्यार्थ्यांसाठी तिन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी बार्कलेज पुणे यांचे सीएसआर फंडातून रूबीक़ॉन या संस्थेमार्फत व्यक्तिमत्व विकास, संभाषण कौशल्य, मुलाखतीचे तंत्र, विविध व्यक्तिमत्व विकासावर तीन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले. शिक्षण काळात सहा अठवड्यांच्या इंडस्ट्रीयल ट्रेनिगं करीता अनेक कंपन्यांमधून विद्यार्थी सुटीच्या काळात सध्या प्रशिक्षण घेत असून काही कंपन्यांमार्फत विद्यार्थ्यांना पेमेंट देखील देण्यात येत असल्याने पालक व विद्यार्थीवर्गात आनंद व्यक्त होत आहे.
 विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व महसुल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी आधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे, प्रवरा प्लेसमेंट समन्वयक प्रा. मनोज परजणे, सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.
 
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!